तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 30 July 2017

नांदेड येथील बलात्काराच्या  घटनेच्या निषेधार्थ माहूर कडकडीत बंद !

माहूर(प्रतिनिधी) नांदेड  येथील कुशीनागर वस्तीत दि.२३ जुलै २०१७  रोजी  एका दलित समाजाच्या  तरुणीवर तलवारीचा धाक दाखवून अत्याचार केल्याची अमानुष घटना घडली. सदरील घटनेचे काल माहुरात तीव्र पडसाड उमटल्याने अ.भा.धम्मसेना माहूर व बहुजन विकास आघाडी च्या वतीने आज दि. ३० रोजी माहूर बंद चे आवाहन केले होते.
           त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माहूर शहरातील व्यापारी बांधवांनी स्वयंस्फुर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन उत्स्फूर्त पणे बंदला पाठिंबा दिला व सर्वच राजकीय पक्ष त्यांमध्ये राष्ट्रवादी,कॉंग्रेस, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा, माकप,  एमआयएम सह संभाजी ब्रिगेड, प्रहार जनशक्ती, यांनी या बंद मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवित घटनेचा तीव्र निषेध केला. यावेळी माहूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत माहूर बंद १०० % यशस्वी केला.   
 धम्मसेना तालुकाध्यक्ष आकाश कांबळे, सिद्धार्थ तामगाडगे, केशव भगत, नगर सेवक दीपक कांबळे, प्रदीप जमदाडे यांचे नेतृत्वात अ.भा.धम्मसेना माहूर व बहुजन विकास आघाडी  ने आज दि.३० जुलै  माहूर बंदची हाक दिली होती. त्या अनुषंगाने आज शहरातील संपुर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती. यावेळी आरोपींना कठोर शासन करून फाशी देण्यात यावी या मागणीचे निवेदन  तहसीलदार माहूर व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.अरुण जगताप यांना निवेदन सादर केले. या बंदला शहरातील तालुक्यातील व माहूर शहरातील विविध सामाजिक संघटना व सर्व पक्षाचे नेत्यांनी पाठिंबा दिला होता .
         यामध्ये, माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, नगरसेवक इलियास बावानी, जयकुमार अडकीने पाटील,विशाल शिंदे पाटील, दिपक कांबळे , नगरसेवक इलियास बावानी, राजू दराडे, सरफराज दोसानी, राजू मगरे, रामराव खडसे, राहुल भगत, पंडित धुपे, त्रिशरण आढागळे, सुभाष दवणे, सिद्धार्थ भालेराव, धम्मपाल मुनेश्वर, प्रतिक कांबळे डॉ.सत्यम गायकवाड, हर्षवर्धन भवरे,कुलदीप भगत, प्रफुल्ल मुनेश्वर, तथागत मुनेश्वर, राहुल राऊत, रेणुकादास वानखेडे यांनी सहभाग घेतला .   
          बंद दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये व कायदा व सुव्यस्था अबाधित राहून शहरातील शांतता अबाधित राहावी यासाठी माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.अरुण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल धावारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता  त्या मुळे सदरील बंद हा शांततेत पार पडला.

 

No comments:

Post a Comment