तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 30 July 2017

वरुड (चक्रपान) येथील १८ वर्षीय युवतीचा विजेच्या धक्याने मृत्यु

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगाव:- तालुक्यातील वरुड (चक्रपान) येथे आज दि.३० जुलै रविवार राेजी सकाळी ०९-३० वाजता घरासमाेर लाेखंडी बांधीव तारावर धुणे वाळवन टाकतांना पुजा प्रभाकर मगर (१८) या युवतीचा विजेच्या जबर धक्याने मृत्यु झाल्याची दुर्दवी घटना घडली.
वरुड (चक्रपान) येथील १८ वर्षीय युवती आज सकाळी ०९-३० च्या सुमारास आपल्या घरासमाेर लाेखंडी बांधीवर कपडे वाळवत टाकत असतांना त्या लाेखंडी बांधीला विजेचा प्रवाह उतरल्याने तिचे हात लागुन विजेचा जबरदस्त धक्का लागुन जागीच काेसळली. हि घटना समजताच तिला सेनगाव ग्रामिण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असता डाँक्टरांनी मृत्यु झाल्याचे घाेषीत केले. त्या युवतीचे सेनगाव ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. युवतीचे चुलते मधुकर बबन मगर यांच्या फिर्यादीवरुन अकस्मात मृत्युची नाेंद करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पाेलीस निरीक्षक मधुकर कारेगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार एस.एन.राठाेड करीत आहे.

No comments:

Post a Comment