तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Sunday, 30 July 2017

लुक इस्ट भारताचा आत्मविश्‍वास हिमालया इतका मोठा केला..!


भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये अमुलाग्र बदल करत प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींनी ‘‘ लुक इस्ट ’’ चि घोषणा देत भारताच्या अंतर्गत संघ राज्यामध्ये पुर्वोत्तर भारतातील राज्यांकडे विशेष लक्ष देत अरुणाचल प्रदेशामध्ये अगदी चिनच्या सिमेवर सुखोई-30,एम.के.आय या अत्याधुनिक लढावू विमानांची तैनाती करत मुजोर चिनच्या घमेंडी व साम्राज्यवादी नितीला तडा देत चिनच्या डोळ्यात डोळा घालत ज्याला इंग्रजी मध्ये आय बॉल टू आय बॉल असे थेट अव्हानच देत पुर्वोत्तर राज्यातून,पुर्वोत्तर एशियामध्ये चिनच्या दादागिरीला बळी पडत असलेल्या देशांना एकत्रीत करत चिनच्या सिमेलगतच्या देशांशी थेट मैत्रीपुर्ण करार करत भारताच्या परराष्ट्र धोरणाला स्वाभिमानाचा कणा दिला. मंगोलिया,व्हिएतनाम,लावोस, थायलंड,फिलीपिन्स,इंडोनिशीया,मलेशिया,तैवान व अति महत्वाचा चीनचा जन्माने हाडवैरी जागतिक तंत्रज्ञानाचा बादशाह जपान या राष्ट्रांशी प्रत्यक्ष जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘‘ लुक इस्ट ’’ या एका धोरणाने चीनच्या ताकतीची झिंग उतरवून टाकली आहे.चीन दक्षिण सागर समुद्रध्वनीमध्ये जी दादागिरी करत कृत्रीम बेटांची निर्मीती करुन त्यावर आरमार व लष्करी तळ झपाट्याने उभे करत असून जपानच्या समुद्रध्वनीतील काही बेटांवर चीन ने ताबा करण्याचा प्रयत्न केला आहे. तर पुर्ण दक्षिण चीन समुद्रध्वनी ही एकट्या चीनची मालकी असून त्यावर कोणत्याही राष्ट्राला दावा करता येणार नाही. भविष्यातील क्रुड ऑईल म्हणजे पेट्रोल व डिझल याचा प्रचंड मोठा साठा नेमका याच भागात आहे. वाळवंटातील अरबीक तेल साठे जेव्हा संपतील तेव्हा चीन या तेलाच्या साठ्यावर जागतीक महासत्ता झालेला असेल ही त्यामागील चीनची धुर्त खेळी आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये मनमोहन सिंह साहेबंाचा काळ भारत म्हणजे  परराष्ट्र व सैन्य समतोलामध्ये एक निष्क्रिय,सामान्य देश या पलिकडे कुणी दखल घेत नव्हते. चीनने जम्मु कश्मीरमध्ये तैनात असलेले तत्कालीन लेफ्टनंट जनरल जस्वाल यांना चीनचा स्टेपल व्हीजा दिला होता.याचा अर्थ जम्मु कश्मिर हा भाग भारताचा आहे हे अमान्य करत भारताचा थेट अपमानच केला. प्रतिक्रीया मात्र शुन्य ताटा खालच्या माजरासारखी. तत्कालीन संरक्षण मंत्री ए.के.अन्टोनी यांनी भ्रष्टाचारमध्ये आपले नाव येऊन प्रतिमा खराब होऊ नये म्हणून 10 वर्ष एकाही शस्त्र खरेदी फाईलवर सहीच केली नाही. देशाची मानहाणी झाली तरी चालेल पण आपल्या मानपानाला धक्का लागू नये. कमाल अशी की, युपीए सरकारच्या पहिल्या पाच वर्षामध्ये कम्युनिष्ट पक्षाचा काँग्रेसला पाठींबा होता. त्यामुळे कॉम्रेट भाऊबंदकी ही चीनच्या विरोधात धोरण आखुच देत नव्हती. म्हणजे तीन पायाची शर्यत हे आमचे परराष्ट्र धोरण.याचा चीनने पुरेपुर फायदा घेत भारतीय बाजारपेठेवर काडीच्या डब्बी पासून फटाक्यापर्यंत, दाढीच्या फोम पासून थेट भारतीय ग्राहकांच्या खिशातच हात घालत पाच लाख कोटी रुपयाचे आर्थिक साम्राज्य भारतात उभे केले. भारताच्या लघु उद्योगाची अक्षरश:धुळघाण झाली. त्यावर कुणी ब्र शब्दही काढला नाही.कारण सोपे ‘‘ राष्ट्रीय स्वाभीमान  जागा होऊ न देता कारकुनी पध्दतीने स्व हिताचे राजकारण करायचे ’’ हे पहिल्या पाच वर्षाचे युपीए सरकारचे फलीत होते. युपीए सरकारचे भाग दोन  काय बोलावे साडे बारा लाख कोटी रुपयाचे घोटाळे म्हणजे कोळसा ते हवा ते आकाश यामध्ये सर्वव्यापी भ्रष्टाचार हा देशाच्या न्याय व्यवस्थेपर्यंत पोहचला. सर्वोच्च न्यायालयाने टेलिफोन घोटाळा व कोळसा घोटाळा आपल्या हातात घेत चौकशी समिती नेमली. दरम्यानच्या काळामध्ये आण्णा हजारेंचे उपोषण भारतीय समाजकारणामध्ये सुप्त राष्ट्रीयत्वाची देशप्रेमाची लाट निर्माण करुन गेले. भ्रष्टाचार विरोधी आण्णा हजारे व त्यांच्या सहकार्‍यांचे आंदोलनाने काँग्रेसची नाव खिळ खिळी करुन टाकली. परंतू कुशल नियोजन असूनही विश्‍वासार्ह संघटन नसल्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना काही करता आले नाही. काँग्रेस विरोधी निर्माण झालेल्या लाटेवर अतिशय चाणाक्षपणे स्वार होण्याचे काम भाजपच्या थिंक टँक ने केले.भाजपाकडे नरेंद्र मोदी नावाचे अमोघ अस्त्र होते. गुजरातचे मुख्यमंत्री यापलिकडे राष्ट्रीयस्तरावर आणखी एक ओळख होती ती म्हणजे तथाकथीत धर्मनिरपेक्ष टोळ्या व काँग्रेसचे टोळके यांच्या टिकेला तिरस्काराला पातळीहीन आरोप व प्रशासनाचा गैरवापर करत नरेंद्र मोदी यांना युपीए सरकाने मौत का सौदागर अशी उपाधीच पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी दिली होती. परंतू नकारात्मक टिकेला उत्तर न देता सकारात्मक,रचनात्मक,कार्यमग्न राहत सतत टिका होत असतांनाही तोंड बंद ठेवत आपल्या कार्यातून बोलणार व्यक्तीमत्व मुख्यमंत्री नरेंद्र मोदी राजकारणातील अजातशस्त्रु म्हणून प्रधानमंत्री पदाचे दावेदार ठरले.इथून भारताच्या राजकीय,सामाजीक,आर्थिक,परराष्ट्र धोरण,लष्करी धोरण यावर मोदी युगाचा ठसा उमठावयास सुरुवात झाली. विरोधकांनी केलेल्या आरोपालाच धार देत जशास तसे परत पाठवून देणे या नितीमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जागतिक दर्जाचे नेते ठरले आहेत. नोट बंदी या एका शब्दाने जगातील भल्या भल्या विचारवंतांना सुध्दा बुचकाळ्यात ठाकले आहे.130 कोटी लोकसंख्या असलेल्या महाकाय देशामध्ये हजार व पाचशे च्या नोटा बाद करत नव्या नोटा चलनात आणण्याचे अशक्य काम जग अवाक होऊन पहात आहे. युनोतील मोदींचे भाषण अतिशय महत्वाचे आहे.130 कोटी लोकसंख्येतील 65 कोटी युवकांना जग दुर्लक्षीत करु शकणार नाही. भारताची युवा क्षमता ही जग बदलून टाकणारी असेन.आम्हाला युनो च्या स्थाई समितीमध्ये सदस्य म्हणून घ्या म्हणून झोळी पसरणार नाही.भारताच्या ईच्छेशिवाय,सहभागाशिवाय जागतीक पातळीवर महत्वाचा निर्णय घेता येणार नाही असे बोलणारे भारताचे ते पहिले पंतप्रधान. नोट बंदीनंतर जगातील टीकाकारही मोदींबद्दल सांभाळून बोलत आहेत. परंतू जनतेचा पाठींबा नसलेल्या रिकाम टेकड्या पश्‍चिम बंगालच्या ममता बॅनर्जी पासून केजरीवालांपर्यंत नेते मोर्चे काढत आहेत.जनता मागील 70 वर्षात पहिल्यांदा हा बदल पहात आहे. सोव्हीएत युनियन च्या विघटनानंतर रशिया दुबळा झाला होता.अगदी उपासमारीची वेळ आली होती.जागतीक महाशक्तीला शक्तीहीन झाल्यासारखे दिवस पहावे लागले. तशीच काहीशी परिस्थीती 2014 पर्यंत युपीए सरकारने करुन ठेवली होती.भारताच्या आर्थिक विकासाचा दर 4.2 वर होता. तर औद्योगिक विकासाचा दर -2 असा होता. 2014 च्या एकहाती बहुमताच्या बळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी नव्या भारताची रचना करत भारताला महाबली जागतीक महासत्ता बनवण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. आडीच वर्षामध्ये पंचवीस वर्षाची झिज भरुन काढली आहे. मोदी हे भारताचे पहिले प्रधान मंत्री ज्यांचा जनतेशी थेट संवाद आहे. त्यामुळे घराणेशाही असलेल्या राजकीय पक्षांची अडचण झाली आहे.टीका रोज टीका परंतू जनमानसात नरेंद्रभाई मोदींच्या निर्णयाचे स्वागत होत असून मोदींनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा देश हिताचा आहे असे वातावरण देशात तयार झाले असून इथेच खर्‍या राष्ट्रवादाची बिजे पेरल्या गेली व याची अडचण चीन सारख्या जागतीक महासत्ता होऊ पहाणार्‍या व सतत भारताची मानहाणी करणार्‍या राष्ट्राला होऊ लागली आहे. कमाल अशी की, एका बाजुला पाकिस्तान अनं दुसर्‍या बाजुला चीन या दोन शत्रु राष्ट्रांशी आपली अंतरराष्ट्रीय सिमा ही 9000 कि.मी.ची आहे. विकासाचा बराच मोठा भाग आपल्याला शस्त्राअस्त्रासाठी खर्च करावा लागतो. 1962 च्या युध्दामध्ये चीनने तिबेटचा लचका तोडत भारताचा 72000 स्के.मी.भूभाग बळकावला या पेक्षा गंभीर म्हणजे भारतातील हिंदु,जैन व बौध्द यांच्यासाठी अतिशय पवित्र असे धार्मिक स्थळ चीनच्या ताब्यात गेले. आपण चीन बरोबर युध्द हारलो इतकेच बोलल्या जाते परंतू आपण राष्ट्रीय धर्माची धर्मस्थळे हरवून बसलो हे कुणीच बोलत नाही. पवित्र कैलास मान सरोवरला दर्शनासाठी जाण्यासाठी चीनची परवानगी घ्यावी लागते. याची नैतिक जबाबदारी काँग्रेस सरकारने आज पर्यंत स्विकारली नाही. गरिबी हटाव चा नारा हा कधी पूर्ण झालाच नाही.महत्वाचे असे की, आता चीन सरकारचे सर्वोच्च नेत्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला चीन भेटीचे निमंत्रण दिले आहे. ते काँग्रेसने स्विकारले आहे. म्हणजेच बलशाली राष्ट्र निर्माण करणार्‍या भारताच्या प्रधानमंत्र्यांच्या धोरणाला सुरुंग लावण्याचे चीन ने काँग्रेसच्या माध्यमातून सुरु केले आहे काय? नोट बंदीचा धाडसी निर्णय घेणारा भारताचा कणखर प्रधानमंत्री चीनला आज भिती घालत आहे. जे अमेरिकेला जमले नाही ते आज भारत करत आहे.अग्नी-5 व 4 यांची यशस्वी चाचणी व अग्नी-6 ची तयारी ही अंतरखंडीय क्षेपणास्त्र (आयसीबीएम)च्या क्लबमध्ये भारत 6 वे राष्ट्र ठरले.अन्यथा चीनच्या भितीने काँग्रेस सरकार चीनच्या कोणत्याही कुरापतीला आदबीने सलाम करायची.चीनच्या परराष्ट्र धोरणाला व व्यापारी बाजारपेठेला भारताने दिलेला हादरा भविष्यात मोदींचा परराष्ट्र भुकंप म्हणून गाजेल व चीनची आर्थिक व लष्करी महासत्तेला भारत थेट अव्हान देत असून अशीया खंडातील महासत्ता म्हणून भारताचा उगम नक्कीच इतिहास प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींच्या नावाने नोंदवेल.... लुक इस्ट या एका शब्दाने भारताचा आत्मविश्‍वास हिमालया इतका मोठा केला.धन्यवाद मोदीजी. राजकीय पक्षांच्या पलिकडे आम्हाला आमच्या पंतप्रधानांचा अभिमान आहे.
सतीश सातोनकर, परभनी ... 9403222001

No comments:

Post a Comment