तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Sunday, 30 July 2017

३० जुलै दिनविशेष लेखन: स्वाती खंदारे

ठळक घटना, घडामोडी

७६२ : खलिफा अल-मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.
१५०२ : क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या सफरीदरम्यान होन्डुरासच्या किनाऱ्याजवळील बे आयलँड्स बेटांतील ग्वानाहा येथे उतरला.
१६२९ : इटलीच्या नेपल्स शहरात भूकंप. सुमारे १०,००० ठार.
१७२९ : बाल्टिमोर शहराची स्थापना.
१८११ : शिवावा, मेक्सिको येथे स्पॅनिश राज्यकर्त्यांनी फादर मिगेल हिदाल्गो इ कॉस्तियाला मृत्युदंड दिला.
१८६६ : न्यू ऑर्लिअन्स येथे राजकीय पक्षाच्या बैठकीवर पोलिस हल्ला. ४० ठार, १५० जखमी.
१८७१ : वेस्टफील्ड या स्टेटन आयलंड फेरीबोटीवर स्फोट. ८५ ठार.
१९३० : उरुग्वेने माँटेव्हिडीयोमध्ये पहिला फिफा विश्वचषक जिंकला.
१९४५ : दुसरे महायुद्ध - जपानच्या आय-५८ या पाणबुडीने अमेरिकेची युएसएस इंडियानापोलिस ही नौका बुडवली. ८८३ ठार.
१९६५ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनने सोशल सिक्युरिटी ऍक्ट ऑफ १९६५वर सही करून मेडिकेर व मेडिकेडची रचना केली.
१९७१ : अपोलो १५ चंद्रावर उतरले.
१९७१ : मोरियोका, जपान येथे ऑल निप्पॉन एरवेझच्या बोईंग ७२७ आणि जपानी वायुसेनेच्या एफ-८६ विमानांची टक्कर. १६२ ठार.
१९८० : व्हानुआतुला स्वातंत्र्य.
२००६ : इस्रायेली वायुसेनेच्या हल्ल्यात १६ बालकांसह २८ असैनिकी व्यक्ती ठार.
२०१४ : पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० पेक्षा अधिक ठार.

*जन्म, वाढदिवस*

१८१८ : एमिली ब्राँटे, इंग्लिश लेखिका.
१८५५ : जॉर्ज विल्हेल्म फॉन सीमेन्स, जर्मन उद्योगपती.
१८६३ : हेन्री फोर्ड, अमेरिकन उद्योगपती.
१९४७ : आर्नोल्ड श्वार्झनेगर, ऑस्ट्रियाचा अभिनेता व कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर.
१९७३ : सोनू निगम, पार्श्वगायक.
१९८० : जेम्स अँडरसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

*मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन*

५७९ : पोप बेनेडिक्ट पहिला.
१७१८ : विल्यम पेन, पेनसिल्व्हेनियाचा स्थापक.
१८११ : मिगेल हिदाल्गो, मेक्सिकोचा स्वातंत्र्यसैनिक.
१८८९ : चार्ली ऍब्सोलम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८९८ : ऑटो फोन बिस्मार्क, जर्मनीचा पहिला चान्सेलर.
१९१२ : मैजी, जपानचा सम्राट.
१९४७ : जोसेफ कूक, ऑस्ट्रेलियाचा सहावा पंतप्रधान.
१९९४ : शंकर पाटील, मराठी लेखक.
१९९७ : बाओ डाइ, व्हियेतनामचा राजा.
२००७ : इंगमार बर्गमन, स्विडिश चित्रपट दिग्दर्शक.
२००७ : मिकेलांजेलो अँतोनियोनी, इटालियन चित्रपट दिग्दर्शक.

No comments:

Post a Comment