तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 30 July 2017

माणगावात लाचखोर कोतवाल व पोलिसांमुळे वृद्ध महिलेची जमिन गेली.


_________________________

सध्या प्रत्येक ठिकाणी जमीन फसवणुकीचे प्रकरण घडताना दिसत आहेत, असेच एक प्रकरण माणगांव तालुक्यातील भुवन या गावात निरक्षर महिला पार्वती हरि गायकर यांच्या सोबत घडले आहे. तेअसे पार्वती हरि गायकर या महिलेची भुवन या गावात जमीन आहे ( गट क्रमांक 288 )ही जमीन हडप करण्यासाठी गावातीलच गोविंद शिंदे व कोतवाल हे पार्वती गायकर या महिलेकडे गेले असता पार्वती गायकर यांना तुम्हाला घरकुलाचे पैसे मिळणार आहेत असे खोटे सांगुन त्या महिलेकडुन जमीनीचे कागदपत्रं हस्तगत केले. व नंतर पार्वती गायकर यांची जमीन परस्परच दुसर्या बनावट नावाच्या व्यक्तीला विकली .जेंव्हा हे प्रकरण पार्वती गायकर या महिलेच्या मुंबईत कामानिमित्त राहाणार्या मुलाला समजले तेंव्हा पार्वती गायकर यांचा मुलगा माणगाव पोलिस स्टेशन मध्ये गोविंद शिंदे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी गेला असता प्रथम पोलिसवाले गोविंद शिंदेवर गुन्हा दाखल करतच नव्हते,तेंव्हा पार्वती गायकर यांचा मुलगा चंद्रकांत गायकर याने मंत्रालयात तक्रार दाखल केली तेंव्हा कुठे आरोपी गोविंद शिंदेना व कोतवालाला अटक न करता पोलिसांनी साधा गुन्हा दाखल केला व गेली एक वर्ष लाचखोर पोलिसांमुळे कोर्टाचे तारिख पे तारिख चे ससेमिरे या वृद्ध महिलेच्या पाठीमागे लावले आहे ,पण या वृद्ध महिलेला लाचखोर पोलिसांमुळेच आज पर्यंत न्याय मिळाला नाही.

No comments:

Post a Comment