तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 31 July 2017

गेवराईच्या अक्षय खरवडे यांची एमबीबीएससाठी मिरजेत निवड

सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. 31 __ तालुक्यातील रुई येथील अक्षय बळीराम खरवडे याने मे - 2017 मध्ये झालेल्या "NEET" परीक्षेत यश संपादन केले असून नुकत्याच जाहीर झालेल्या शासकीय कोठ्यातून त्याची मिरज येथे एमबीबीएस च्या वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली, याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
       अक्षय खरवडे याने मे 2017 ला झालेल्या "NEET" परीक्षेत कठोर मेहनत घेऊन 521 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. या पार्श्वभूमीवर त्यांची शासकीय कोठ्यातून एमबीबीएस साठी मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात निवड झाली या यशाबद्दल त्यांचे लातूर येथील चौघुले क्लासेसचे प्रा.चौघुले, सहकारी व्यवस्थापक प्रा. प्रशांत सूर्यवंशी, प्रा. विराज चौघुले, बीड येथील संस्कृती विद्यालयाचे संस्थापक व बालहक्क कृती समितीचे अध्यक्ष दत्ता नलावडे, भागवत जाधव, राम कोळपे, अशोक नवले, बाबुराव पवार, अमोल कदम, भरत भोगे, त्रिंबक पवार यांच्यासह सर्व मित्रपरिवार, शिक्षक, नातेवाईक आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढीक शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment