तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Sunday, 30 July 2017

अफ्रिका व ईजिप्त देशात थिरकणार गेवराईतील 'शिवाजीरावांचा' तबला

सुभाष मुळे..
-----------
गेवराई, दि. 30 __ महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडय़ातील विशेषतः बीड जिल्ह्य़ाच्या गेवराई तालुक्यातील धोंडराईचे भूमिपुत्र शिवाजी गायकवाड यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. आता अफ्रिका व ईजिप्त या देशात 'शिवाजीरावांचा' तबला थिरकणार आहे.
      महाराष्ट्रातील प्रसिद्ध तबला वादक व बीड जिल्हयाच्या गेवराई तालुक्यातील धोंडराईचे भूमिपुत्र शिवाजी गायकवाड यांचा धोंडराई गाव, तालुका, जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र राज्यास अभिमान आहे. तबला अलंकार, तालरत्न शिवाजी गायकवाड हे भारत देशाचे  सांगितीक प्रतिनिधित्व करण्यासाठी मोरेक्को ( नॉर्थ अफ्रिका ) आणि ईजिप्त ( कैरो ) या परदेश दौऱ्यावर दि.12 अॉगस्ट रोजी रवाना होत आहेत. उत्तराखंड येथील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या मसुरी येथील मसुरी इंटरनॅशनल स्कूलचे संगित शिक्षक म्हणून शिवाजी गायकवाड हे कार्यरत आहेत. धोंडराई येथील तबला वादक शिवाजी गायकवाड यांनी गेवराई येथील आर.बी. अट्टल महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. पुढे संगीत शिक्षण घेऊन करिअरसाठी त्यांना मसुरीच्या शाळेने संगीत शिक्षकपदी नियुक्त केले. शाळा-महाविद्यालयात त्यांनी अनेक संगीत वाद्य कार्यक्रम केले. अनेक गायक, वाद्य कलावंत घडविले, युवा महोत्सव गाजविले. नॉर्थ आफ्रिका व इजिप्त कैरो या देशात त्यांना तबला सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. भारतातून फक्त तिघांचीच निवड झाली आहे. आणि महाराष्ट्रातुन एकमेव बीड जिल्हयाच्या गेवराई तालुक्यातील धोंडराईचे भूमिपुत्र शिवाजी गायकवाड यांचीनिवड झाली.
      या निवडीबद्दल संगीतकार भारत अण्णा लोळगे, ह.भ.प. उत्तम नाना मोटे, आ. अमरसिंह पंडित, आ. लक्ष्मणराव पवार, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, प्राचार्या डॉ. रजनी शिखरे, डॉ. मुरलीधर मोटे, अॅड. सुभाष निकम, प्रा. बापु घोक्षे, प्रकाश भुते, प्रा. केशव हमने, प्रा. राजेंद्र बरकसे, राजाभाऊ काळे, अंतरकर साहेब, आनंद दाभाडे, महेश नागरे, अक्रूर महाराज, शाहीर रामभाऊ मुळे, अशोक जायभाये, शाहीर व गीतकार विलासबापू सोनवणे, अभिनेते आणि दिग्दर्शक डॉ. सुधीर निकम, ज्ञानेश्वर मोटे, प्रशांत रुईकर, मुकुंद टाक, मधुकर बैरागी, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, गेवराई शहर व तालुक्यातील संगीतप्रेमी मित्रांनी शिवाजी गायकवाड यांचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment