तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 30 July 2017

सोनपेठ येथे सकल मराठा समाजाची बैठक

सोनपेठ / प्रतिनिधी :
तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या मुंबई येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा संदर्भात दिनांक 31 जुलै सोमवार रोजी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्या प्रलंबीत आसुन या मागण्यासंदर्भात यापुर्वी मराठा समाजाने प्रत्येक जिल्ह्यात मोठमोठे लांखोच्या संख्येनेे मराठा क्रांती मोर्चे काढले होते तरीही समाजाच्या मागण्यासंदर्भात शासनस्तरावर काहीही झाले नसल्यामुळे नऊ ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा समाजाच्या मराठा क्रांती मोर्चा चा समारोप होणार असून महाराष्ट्रातुन मोठ्या संख्येने येऊन भव्य असा क्रांती मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात सोनपेठ तालुक्यातील समाज बांधव सुध्दा मोठ्या संख्येने सहभागी होणार असून यासाठीचे नियोजन करण्यासाठी आज दिनांक 31 जुलै वार सोमवार रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सभागृहात दुपारी एक वाजता महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला तालुक्यातील सकल मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहनण्याचे अावाहन सकल मराठा समाजाच्या वतीने केले आहे.

No comments:

Post a Comment