Breaking News
Loading...

Saturday, 29 July 2017

वाघाळा येथील गोरगरीब, शेतक-यांना स्वस्त धान्याची प्रतिक्षा

★जोडणी नंतर ही तहसील प्रशासना कडून धान्य देण्याची कार्यवाही होईना
प्रतिनिधी
पाथरी:- तालुक्यातील वाघाळा येथिल ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर चौकशी पथकाच्या अहवाला नंतर १३ जुलै रोजी स्वस्त धान्य दुकानाचा परवाना जिल्हाअधिकारी परभणी यांच्या आदेशान्वये रद्द झाला त्या नंतर मुदगल येथिल स्वस्त धान्य दुकानदाराला येथिल कोठा जोडून तात्पूर्त्या व्यस्थेचे लेखी आदेश तहसीलदारांनी २६ जुलै रोजी काढून ही स्वस्त धान्य देण्याची कार्यवाही होत नसल्याने या योजनेचे लाभार्थी स्वस्त धान्या पासुन वंचीत राहात आहेत.
वाघाळा येथिल स्वस्तधान्याचा परवाना रद्द झाल्या नंतर गावात सुरू असलेले जुन महिण्याचे वाटप अर्धवट अवस्थेत बंद केले. त्या नंतर जुलैचा कोठा नविन जोडणी नंतर गोरगरीब आणि शेतकरी लाभार्थ्यांना मिळेल अशी अपेक्षा होती मात्र पाथरी तहसीलदारांनी तात्पुर्ती व्यवस्था म्हणून मुदगल येथिल स्वस्तधान्य दुकानाला जोडणीचे लेखी आदेश २६ जुलै रोजी काढल्या नंतर जुलै महिण्याचे तरी स्वस्तधान्य नागरीकांना मिळेल अशी अपेक्षा असतांना तहसील प्रशासन मात्र धान्य देण्याची कार्यवाही का करत नाही. असा प्रश्न गोरगरीबांना पडला आहे.दुबार,तिबार पेरणी करून ही पावसा अभावी पीके करपुन गेल्याने दुष्काळाचे सावट गडद होत असतांना किमान शासनाच्या वतिने देण्यात येणारे या महत्वपुर्ण योजनेचे धान्य गोरगरीबांना त्वरीत देण्याची तसदी तहसील प्रशासनाने घ्यावी आणि गरीबांची होत असलेली उपासमार थांबवावी अशी मागणी या योजनेच्या लाभार्थ्यां मधून होत आहे.

No comments:

Post a Comment