तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 30 July 2017

सेलू-पाथरी रस्त्यावर दोन मोटारसायकलची समोरा समोर धडक

कार्तिक पाटील

★पाच जन गंभिर जखमी

पाथरी:- सेलू-पाथरी मार्गावर कारखाना परीसरातील १३२ केव्ही उपकेंद्रा जवळ दोन मोटार सायकलची समोरा समोर धडक होऊन पाच जन गंभिर जखमी झाले असून जखमींना तातडीने परभणी कडे हलवण्यात आले आहे.
सायंकाळी सहा ते सात च्या सुमारास पाथरी येथून विमा भरून देहगाव येथिल शेतकरी कुंडलीक गलबे वय ७० ,पंडीत कुंडलीक गलबे, ४०, गणेश आश्रोबा गलबे ४५ हे पॅशन एमएच२२ एजे १५०६ वरून गावाकडे जात होते तर सेलू कडून सुरेश केवळीराम टाक ३०, आणि अनिल गायसमुद्रे हे पाथरीकडे येत असतांना पेट्रोल पंपाजवळ समोरा समोर एकमेकावर आदळले यात कुंडलीक गलबे यांचा पाय फॅक्चर झाला असून इतर सर्वांच्या डोक्याला गंभिर दुखापत झाली असून सर्व गंभिर जखमींना ग्रामिण रुग्नालयात उपचार केल्या नंतर तातडीने परभणी कडे हलवण्यात आले आहे

No comments:

Post a Comment