तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 29 July 2017

*माहिती अधिकाराचे द्वितीय अपील आजपासून ऑनलाईन करता येणार प्रदिप कोकडवार जिंतूर (संकलितवृत्त) : माहिती अधिकारासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा देण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. आजपासून द्वितीय अपील ऑनलाईन करण्याची सुविधा मुंबई येथे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे, असे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज सांगितले. राज्य माहिती आयोगात मोठ्या प्रमाणात दाखल होणारे द्वितीय अपिल प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी तसेच राज्य माहिती आयोगाच्या कारभारात गतिमानता आणण्यासाठी आयोगाच्या  द्वितीय ऑनलाईन अपील आज्ञावली प्रणालीचे  उद्घाटन मुख्य सचिवांच्या हस्ते करण्यात आले. नवीन प्रशासकीय भवनातील तेराव्या मजल्यावरील राज्य माहिती आयोगाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी राज्य माहिती आयुक्त अजितकुमार जैन, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय उपस्थित होते.   राज्यभरात  माहितीचा अधिकार अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई येथे राज्य माहिती आयोगाच्या मुख्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर  सात ठिकाणी आयोगाची खंडपीठे देखील आहेत. मुख्यालय व अन्य सात खंडपीठातील कार्यालयांमध्ये दरवर्षी राज्यभरातून  मोठ्या प्रमाणात अपील दाखल केले जातात. २०१४ पर्यंत राज्यातील विविध सार्वजनिक प्राधिकरणे/प्रशासकीय विभाग यांच्या स्तरावरुन माहितीचा अर्ज व त्यावरील कार्यवाही आणि प्रथम अपील व त्यावरील निर्णय ही प्रक्रिया पोस्टाद्वारे (मॅन्युअली) करण्यात येत होती. मात्र २०१५ पासून मंत्रालयीन स्तरावरील तसेच २०१६ पासून सर्व क्षेत्रीय स्तरावरील सार्वजनिक प्राधिकरणे/प्रशासकीय विभाग यांच्यामार्फत केली जाणारी ही कार्यवाही ऑनलाईन पध्दतीने करण्यास सुरुवात झाली.  तथापि, द्वितीय स्तरावरील अपील प्रक्रिया मात्र अद्यापही कागदोपत्रीच करण्यात करण्यात येत होती. राज्य माहिती आयोगात संपूर्ण राज्यभरातून प्रतिवर्षी सर्वसाधारणपणे ४० हजार द्वितीय अपील प्रकरणे दाखल होतात. या मोठ्या प्रमाणात दाखल होणाऱ्या अपिलांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी आता सदरची प्रक्रिया देखील ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आजपासून बृहन्मुंबई खंडपीठापासून झाली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना माहितीचा अर्ज, प्रथम अपील अर्ज याबरोबरच द्वितीय अपील अर्जदेखील थेट ऑनलाईन पध्दतीने राज्य माहिती आयोगाकडे सादर करता येईल. तसेच अर्जांची तपासणी, अर्जांच्या सद्य:स्थितीची माहिती, शुल्क भरणा, सुनावणीची नोटीस व अपिलावरील निर्णय निर्गमित अशा सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील, असे सांगत मुख्य सचिवांनी राज्य माहिती आयोगाचे अभिनंदन केले. यावेळी राज्य माहिती आयुक्त श्री. जैन यांनी प्रास्ताविक केले. ऑनलाईन प्रक्रियेबाबतचे सादरीकरण देखील करण्यात आले. *अशी आहे द्वितीय अपिल ऑनलाईन प्रक्रिया* नागरिकांना घरी बसून ऑनलाईन पध्दतीने द्वितीय अपील सादर करता येईल. त्यासाठी पोस्टल व्यवहार किंवा प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. आयोगाच्याhttps://sic.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन द्वितीय अपील करणे शक्य होणार आहे. या अपिलासाठी आकारण्यात येणाऱ्या विहित शुल्काचा भरणा देखील ऑनलाईन ई-पेमेंटद्वारे करता येईल. ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केल्यानंतर तयार झालेला नोंदणी क्रमांक अपिल करण्याऱ्या व्यक्तीस एसएमएस द्वारे प्राप्त होईल. प्राप्त द्वितीय अपील अर्जांची छाननी नोडल ऑफिसर यांच्यामार्फत ऑनलाईन पध्दतीनेच करण्यात येईल. द्वितीय अपिलांची छाननी केल्यानंतर जर तो अपूर्ण असेल तर तो अपिल करणाऱ्यास ऑनलाईन पध्दतीने कारणासहित परत पाठविण्यात  येईल. तसेच अन्य खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील असल्यास तो संबंधित खंडपीठाकडे पाठवून त्याची कल्पना अपिल करणाऱ्यास ऑनलाईन पध्दतीने देण्यात येते

माहिती अधिकाराचे द्वितीय अपील आजपासून ऑनलाईन करता येणार
प्रदिप कोकडवार
जिंतूर (संकलितवृत्त) : माहिती अधिकारासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा देण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. आजपासून द्वितीय अपील ऑनलाईन करण्याची सुविधा मुंबई येथे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे, असे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज सांगितले.

राज्य माहिती आयोगात मोठ्या प्रमाणात दाखल होणारे द्वितीय अपिल प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी तसेच राज्य माहिती आयोगाच्या कारभारात गतिमानता आणण्यासाठी आयोगाच्या  द्वितीय ऑनलाईन अपील आज्ञावली प्रणालीचे  उद्घाटन मुख्य सचिवांच्या हस्ते करण्यात आले. नवीन प्रशासकीय भवनातील तेराव्या मजल्यावरील राज्य माहिती आयोगाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी राज्य माहिती आयुक्त अजितकुमार जैन, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय उपस्थित होते.  

राज्यभरात  माहितीचा अधिकार अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई येथे राज्य माहिती आयोगाच्या मुख्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर  सात ठिकाणी आयोगाची खंडपीठे देखील आहेत. मुख्यालय व अन्य सात खंडपीठातील कार्यालयांमध्ये दरवर्षी राज्यभरातून  मोठ्या प्रमाणात अपील दाखल केले जातात.

२०१४ पर्यंत राज्यातील विविध सार्वजनिक प्राधिकरणे/प्रशासकीय विभाग यांच्या स्तरावरुन माहितीचा अर्ज व त्यावरील कार्यवाही आणि प्रथम अपील व त्यावरील निर्णय ही प्रक्रिया पोस्टाद्वारे (मॅन्युअली) करण्यात येत होती. मात्र २०१५ पासून मंत्रालयीन स्तरावरील तसेच २०१६ पासून सर्व क्षेत्रीय स्तरावरील सार्वजनिक प्राधिकरणे/प्रशासकीय विभाग यांच्यामार्फत केली जाणारी ही कार्यवाही ऑनलाईन पध्दतीने करण्यास सुरुवात झाली.

 तथापि, द्वितीय स्तरावरील अपील प्रक्रिया मात्र अद्यापही कागदोपत्रीच करण्यात करण्यात येत होती. राज्य माहिती आयोगात संपूर्ण राज्यभरातून प्रतिवर्षी सर्वसाधारणपणे ४० हजार द्वितीय अपील प्रकरणे दाखल होतात. या मोठ्या प्रमाणात दाखल होणाऱ्या अपिलांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी आता सदरची प्रक्रिया देखील ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आजपासून बृहन्मुंबई खंडपीठापासून झाली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना माहितीचा अर्ज, प्रथम अपील अर्ज याबरोबरच द्वितीय अपील अर्जदेखील थेट ऑनलाईन पध्दतीने राज्य माहिती आयोगाकडे सादर करता येईल. तसेच अर्जांची तपासणी, अर्जांच्या सद्य:स्थितीची माहिती, शुल्क भरणा, सुनावणीची नोटीस व अपिलावरील निर्णय निर्गमित अशा सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील, असे सांगत मुख्य सचिवांनी राज्य माहिती आयोगाचे अभिनंदन केले.

यावेळी राज्य माहिती आयुक्त श्री. जैन यांनी प्रास्ताविक केले. ऑनलाईन प्रक्रियेबाबतचे सादरीकरण देखील करण्यात आले.
अशी आहे द्वितीय अपिल ऑनलाईन प्रक्रिया

नागरिकांना घरी बसून ऑनलाईन पध्दतीने द्वितीय अपील सादर करता येईल. त्यासाठी पोस्टल व्यवहार किंवा प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. आयोगाच्याhttps://sic.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन द्वितीय अपील करणे शक्य होणार आहे. या अपिलासाठी आकारण्यात येणाऱ्या विहित शुल्काचा भरणा देखील ऑनलाईन ई-पेमेंटद्वारे करता येईल.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केल्यानंतर तयार झालेला नोंदणी क्रमांक अपिल करण्याऱ्या व्यक्तीस एसएमएस द्वारे प्राप्त होईल. प्राप्त द्वितीय अपील अर्जांची छाननी नोडल ऑफिसर यांच्यामार्फत ऑनलाईन पध्दतीनेच करण्यात येईल. द्वितीय अपिलांची छाननी केल्यानंतर जर तो अपूर्ण असेल तर तो अपिल करणाऱ्यास ऑनलाईन पध्दतीने कारणासहित परत पाठविण्यात  येईल. तसेच अन्य खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील असल्यास तो संबंधित खंडपीठाकडे पाठवून त्याची कल्पना अपिल करणाऱ्यास ऑनलाईन पध्दतीने देण्यात येते

No comments:

Post a Comment