तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 30 July 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

एमआयएमच्या विरोधामुळे लेखिका तस्लिमा नसरीन यांना आपला औरंगाबाद दौरा अर्ध्यावरच सोडावा लागला. तस्लिमा नसरीन या अजिंठा-वेरूळ या पर्यटनस्थळाला पाहण्यासाठी औरंगाबाद मध्ये आल्या होत्या.

तुम्ही रेल्वेच्या एसी कोच मधून प्रवास करण्याच्या विचारात असाल तर झोपण्यासाठीचे ब्लँकेट सोबत घेऊनच निघा. कारण यापुढं एसी कोचमध्ये ब्लँकेट न पुरवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे.

मन की बात - आमच्या सुकन्या देशाचं नाव मोठं करत आहेत, वर्ल्ड कप जिंकण्याचं महिला क्रिकेट संघाचं स्वप्न पूर्ण झालं नाही. पण त्या सामना जिंकला नसल्या तरी देशवासीयांची मनं जिंकली आहेत.

केरळ = संघ स्वयंसेवकाच्या हत्ये प्रकरणी तिरुअनंतपुरम मध्ये पाच जण ताब्यात.

नागपूर = सावनेरच्या माळेगाव (टाऊन) येथील अपघातातील मृतांची संख्या 5 झाली, ट्रॅव्हल्सची ऑटोला धडक, तिघांचा रात्रीच तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू.

भंडारा = विजेच्या धक्क्याने अंबागड आश्रम शाळेतील विध्यार्थ्याचा मृत्यू . शाळा बंद करण्याची आदिवासी नेत्यांची मागणी.

मन की बात - अर्थव्यवस्थेत GST चे सकारात्मक परिणाम होतील.

सातारा = कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांनी उघडले, 10275 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

अकोला = चलनातून बाद केलेल्या 20 लाखाच्या नोटा जप्त, अकोल्यातील खोलेश्वर परिसरात पोलिसांची कारवाई.

जम्मू-काश्मीर - पुलवामा जिल्ह्यातील तहाब भागात भारतीय लष्करानं दोन दहशतवाद्यांना केला खात्मा.

राष्ट्रपतींबाबत आक्षेपार्ह पोस्ट भोवली, महाराष्ट्रातील दोन मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा.

केरळ = RSS स्वयंसेवकाच्या हत्येच्या निषेधार्थ केरळ भाजपचं राज्यव्यापी बंदचं आवाहन.

नवी दिल्ली  पोलिसांच्या विशेष पथकाकडून तस्कर महिलेला अटक. 14 पिस्तुल केल्या जप्त.

मुंबई = सिद्धी साई इमारत दुर्घटना प्रकरण - अनिल मंडलला पार्क साईट पोलिसांनी केली अटक.

जोहन्सबर्ग = येथे असलेले दक्षिण आफ्रिके मधील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम एफएनबी कोसळल्याने किमान दोन जण ठार झाले तर 17 जण गंभीर जखमी झाले.

नांदेड = लोहा तालुक्याच्या हद्दीवर माळेगाव नजीक बस व मालवाहू ट्रकचा समोरा-समोर अपघात, 13 जण जखमी.

No comments:

Post a Comment