तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 30 July 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

देशात सध्या 42 टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले असून पुढील पाच वर्षात हेच प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा मानस आहे- सुरेश प्रभू

मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मुक मोर्चात परभणी जिल्ह्यातून एक लाख मराठे सहभागी होण्याचा निर्धार.

पंतप्रधान पीकविमा योजनेचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, रविवारीही राज्यभरातील बँकांमध्ये शेतक-यांच्या रांगा, मुदतवाढ मिळवण्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न.

आर्थिक वर्ष 2016-17चा इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, मुदतवाढ दिली जाणार नाही, आयकर विभागातल्या अधिका-याचं स्पष्टीकरण.

बाबासाहेब पुरंदरेंना पोलीस संरक्षणात फिरावं लागणं दुर्देव: राज ठाकरे

काँग्रेस नगरसेवकाने एका तरुणावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर मध्ये समोर आला आहे. सुभाष लोंढे असं या नगरसेवकाचं नाव आहे.

मुंबई = मनोरा आमदार निवासातील छत कोसळले, खोली क्रमांक 112 मधील घटना, आमदार सतीश पाटील यांच्या खोलीतील छत कोसळले.

मॉस्को = 755 अमेरिकी राजनैतिक अधिका-यांनी रशिया सोडावं: व्लादिमिर पुतिन.

मुंबई विद्यापीठाचे 153 निकाल जाहीर, 90 टक्के मूल्यांकन पूर्ण झाल्याचा विद्यापीठाचा दावा.

अकोला = द्वितीय श्रावण सोमवार निमित्त नागझरी येथून कावड घेऊन येणा-या बार्शि टाकळीच्या युवकांना रविवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास नायगाव जवळ घेराव घालून मारहाण करण्यात आल्याची माहिती.

व्हेनुझुएला मध्ये संविधानात बदल घडवून आणण्याकरिता मतदान प्रक्रिया दरम्यान झालेल्या हिंसाचारात एका उमेदवारासह विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.

पुणे = सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी पदवीधरांना नोंदणीची मुदत वाढवली, 3 ऑगस्ट पर्यंत करता येणार नोंदणी.

कोल्हापूर = अंबाबाई मंदिर समिती सुनावणीबाबत त्वरित अहवाल देण्याबाबत जिल्हाधिका-याना सांगणार, पुजारी हटाव संघर्ष समितीला पालकमंत्री चंद्रकांतदादांची ग्वाही.

जातीची लेबलं लावून इतिहासाकडे पाहू नका- राज ठाकरे

जम्मू-काश्मीर = मुसळधार पावसामुळे उधमपूरमध्ये पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत.


जम्मू-काश्मीर = मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी बौद्ध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या तिबेटचे धर्मगुरू दलाईलामा यांचं केलं स्वागत

कोलकाता = महात्मा गांधी रोड मेट्रो स्टेशनवर चालत्या ट्रेन मधून एका व्यक्तीनं उडी मारून केली आत्महत्या, मेट्रो सेवा प्रभावित.

ओडिशा = भद्रक, बालासोर आणि केंद्रपाडा जिल्ह्यांत वीज पडून 11 लोकांचा मृत्यू, 8 जखमी.

पुणे = दोन जेसीबींच्या मदतीने सिंहगड घाटातील दरड काढण्याचं काम सुरू, अनेक पर्यटक अद्याप गडावरच.

औरंगाबाद = सावरकर चौकात वाहतूक पोलिसाला वाहनचालकाने केली मारहाण. वाहनचालकास जवाहर नगर पोलीस स्थानकात नेले.

फक्त तीन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब, वंचित आणि महिलांच्या विकासासाठी 106 योजना केल्या लागू- अमित शाह.

नवी दिल्ली = काँग्रेस कडून राज्यसभेत व्हिप जारी.

सोलापूर = अभाविपच्या वतीने शिवाजी चौक येथे अबू आझमी यांच्या पुतळयाचे दहन.

जम्मू काश्मीर- श्रीनगर आणि बांदीपोरा जिल्ह्यात अधिका-यांनी 7 हेक्टरवरील भांगाचं पीक केलं नष्ट.

चंद्रपूर = कोठारी वनपरिक्षेत्रात चितळाची शिकार, 12 जणांना अटक, चितळाचे मांस व चामडे जप्त.

मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर नाशिकच्या शेतकऱ्यांच्या भाजीपाला विक्रीसाठी व्यवस्था, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची नाशिकच्या बस पोर्ट कार्यक्रमात घोषणा.

नाशिक = एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा दिवाळीपर्यंत निर्णय घ्या, नाशिकच्या बस पोर्ट भूमिपूजन सोहळ्यात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी.

इंग्लंड मध्ये 150 जहालमतवाद्यांचे पासपोर्ट केले रद्द.

No comments:

Post a Comment