विशेष प्रतिनिधी...
--------------------
गेवराई, दि. 31 __ महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आंतर शालेय तालुका स्तर व्हॉलीबॉल स्पर्धेत विविध वयोगटात आर.बी. अट्टल महाविद्यालय, शारदा विद्या मंदिर, इंदिरा गांधी स्कुल, न्यू हायस्कुल महिला कॉलेजचा संघ आपापल्या गटात विजयी झाले. भारतीय ऑलिम्पिकमध्ये हॉकीचा सुवर्णपदक मिळवून देणारे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन गेवराई येथील महिला महाविद्यालयात एका भव्य कार्यक्रमात राष्ट्रीय खेळाडू, जेष्ठ क्रीडा शिक्षक, पंच, प्रशिक्षक यांचा गौरव आणि शालेय तालुका स्तर व्हालीबॉल स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. कांचन परळीकर तर प्रमुख उदघाटक म्हणून पत्रकार सुभाष मुळे, प्रमुख उपस्थिती एन एन सी. ऑफिसर एस.पी.सूर्यवंशी यांची होती. दीप प्रज्वलित करून आणि मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. प्रास्ताविक तालुका क्रीडा स्पर्धा प्रमुख प्रा. राजेंद्र बरकसे यांनी केले. उदघाटनपर भाषणात पत्रकार सुभाष मुळे यांनी विद्यार्थ्यांना शिकवून परिक्षा घेतली जाते आणि काहींना शिकण्यापुर्विच परिस्थितीशी परिक्षा द्यावी लागते हे द्विआंगी क्रम विद्यार्थ्यांनी लक्षात घेऊन भाग्यवान युवकच या स्तरापर्यंत येऊन पोहचतात. शारीरिक आणि मानसिक परिस्थिती सुधारण्यासाठी खेळाडूंनी नियमित व्यायाम, समतोल आहार, शालेय अभ्यास या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि आपल्या शाळेचे, गावाचे, तालुक्याचे, जिल्हयाचा नावलौकिक वाढवावा असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. कांचन परळीकर या म्हणाल्या की, खेळाडूंनी खेळ खेळत असताना खिळाडू वृत्ती जोपासून सांघिक एकता आणि सुदृढता अंगी बाळगावी असे आवाहन केले. उपस्थितांचे स्वागत क्रीडा विभागप्रमुख डॉ. प्रविण शिलेदार, प्रा.बाबू वादे, महेश घोलप, डॉ. संजय तळतकर आदींनी केले. या कार्यक्रमात राष्ट्रीय खेळाडू चंद्रसेन सोनवणे, सय्यद गफ्फार भाई, गोपाळ मोटे, रुपाली राठोड, मयूर मोटे, केतन गायकवाड, मोसीन शेख, आकांक्षा देवकर, श्रद्धा साळुंके, तुषार शिंदे आदी खेळाडू व जेष्ठ क्रीडा शिक्षक महादेव घोळवे, केशव बारगजे, प्रा.बडवे, सुरेश गरड, देविदास गिरी, भोसले, सुदाम गुंजाळ यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बाबू वादे यांनी केले.
तालुका स्तर व्हॉलीबॉल स्पर्धेत 14, 17, 19 वर्षे वयोगटातील मुले आणि मुली यांचे 16 संघ सहभागी झाले होते. विविध गटात आर.बी. अट्टल कॉलेज, महिला कॉलेज, शारदा विद्या मंदिर, इंदिरा गांधी इंग्लिश स्कूल ,न्यू हायस्कुल संघ विजयी झाले. ऑफिशियल पंच जबाबदारी जेष्ठ खेळाडू रुपाली राठोड, अविनाश वाघमारे, सोमेश्वर टाक, प्रशांत सिरसाट, बॉबी माटे, महेश नाईक, राहुल सोनकांबळे यांनी पार पाडली. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी क्रीडा विभागप्रमुख डॉ. प्रविण शिलेदार, डॉ. भीष्मा रासकर, डॉ.बापू घोक्षे, सुरेश तळतकर, प्रा.चव्हाण, डॉ.सावंत, प्रा.गोकुळ कदम, डॉ.किवणे, प्रा. शिवाजी दिवाण, प्रा.खरात आदींनी परिश्रम घेतले.
╭════════════╮
▌ प्रतिनिधी *गेवराई* बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787 ▌
╰════════════╯