Breaking News
Loading...

Friday, 4 August 2017

नोटाबंदी काळात बुडालेला 142 कोटींचा टोल राज्य सरकार देणार.

_________________________

नोटाबंदीच्या काळात बुडालेल्या टोलची रक्कम टोल कंपन्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. टोल कंपन्यांना एकूण 142 कोटी रुपये फडणवीस सरकार देणार आहे. नोटाबंदीच्या काळांत वाहनधारकांची अडचण होऊ नये, यासाठी राज्यातील टोलनाक्यांवर 24 दिवस टोलबंदी जाहीर करण्यात आली होती. या टोलबंदीच्या काळात बुडालेली रक्कम राज्य सरकार कंपन्यांना देणार आहे.142 कोटी रुपयांपैकी 100 कोटींपेक्षा जास्त रुपये हे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई एंट्री पॉइंट, वांद्रे-वरळी सी लिंक या टोल नाक्यांवरील आहेत. सुरुवातीला ही रक्कम केंद्राकडून मिळवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला होता. मात्र केंद्राकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राज्य सरकार आपल्या तिजोरीतून ही रक्कम देणार आहे. टोल कंपन्यांना टोल वसुलीची मुदत वाढवून देण्याचा विचारही राज्य सरकारने केला होता, मात्र हा व्यवहार टोल कंपन्यांसाठी फायद्याचा ठरण्याच्या शक्यतेने राज्य सरकारने हा निर्णय टाळला. अखेर 24 दिवसांच्या टोलबंदीचे पैसे थेट देण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं.

No comments:

Post a Comment