Breaking News
Loading...

Tuesday, 1 August 2017

मुंबई-गोवा हायवेसाठी 18 हजार कोटी, कल्याण- ठाणे-मुंबई लवकरच जलमार्ग.


_________________________

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातील 25 हजार कोटींच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. महाराष्ट्रातील विविध आमदार-खासदारांशी चर्चा करत, गडकरींनी अनेक प्रकल्पांची घोषणा केली.यामध्ये मुंबई-गोवा हायवेसाठी 18 हजार कोटी, कल्याण- ठाणे-मुंबई जलमार्ग, औरंगाबाद-जालना मार्गाला मंजुरी, ठाणे-भिवंडी 8 पदरी करणार इत्यादी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या.या बैठकीसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार, कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक, अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे, शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरेही उपस्थित होते.
या बैठकीत कल्याण-ठाणे-मुंबई असा जलवाहतुकीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्याबाबत लवकरच टेंडर काढण्यात येणार आहे.या प्रकल्पासाठी 2 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील पहिले 500 कोटीचे टेंडर काढले जातील. तर 1 हजारकोटी केंद्र सरकार आणि 1 हजार कोटी महापालिका खर्च करेल. ठाणे -भिवंडी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयद्वारे करण्यात येणार आहे. ठाणे भिवंडी बायपास (नाशिक) 8 पदरी करणार. यासाठी1 हजार कोटीची तरतूद आहे. याचं टेंडर 1 महिन्यात काढण्यात येईल. यावेळी मुंबई- गोवा महामार्गासाठी 18 हजार कोटींची तरतूद करण्यात आली.मात्र अद्याप 60 टक्के भू संपादन झालेलं नाही. याचं स्ट्रक्चरल काम सुरु असल्याचं सांगण्यात आलं.

No comments:

Post a Comment