तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 2 August 2017

कुलगाममध्ये 2 दहशतवादी ठार, शोपियामध्ये 3 दहशतवाद्यांना घेरलं.

_________________________

जम्मू-काश्मीर मध्ये दहशवताद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु आहे. कुलगाम मध्ये सुरक्षा रक्षकांना 2 दहशवताद्यांना ठार केलं आहे. तर शोपिया मध्ये 3 दहशवताद्यांना जवानांनी घेरलं आहे. शोपिया मध्ये चकमकीत एक मेजर आणि एक जवान शहीद झाला आहे. तर जवान जखमी झाला आहे. सुरक्षा रक्षकांना मध्यरात्री 2.30 दरम्यान गस्त घालत असतांना कळाले की मातृबुग मध्ये काही दहशतवादी लपले आहेत. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी ऑपरेशन सुरु असतांना जवानांच्या गाडीवर फायरिंग सुरु झाली. ज्या मध्ये एक मेजर आणि 2 जवान जखमी झाले. त्यांना लगेचच हॅलिकॉप्टरने श्रीनगरला आणण्यात आलं. पण उपचारा दरम्यान मेजर आणि एका जवानाने प्राण सोडले.

No comments:

Post a Comment