तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Friday, 4 August 2017

एक-दोन नव्हे, 300 भाकड गायी सांभाळणारा रत्नागिरीचा अवलिया.


_________________________

घराच्या पडवीत किंवा गोठ्यात बांधलेली दोन-चार जनावरं पाळणंही लोकांना आता कठीण जातं. पण रत्नागिरी जिल्ह्यात असा एक अवलिया आहे, जो थोड्या-थोडक्या नाही तर तब्ब्ल 300 हून अधिक गायी सांभाळत आहे. विशेष म्हणजे या गायी त्यांच्यास्वतःच्या नसून इतरांनी नाकारलेल्या आहेत. सांभाळायला जड झालेल्या किंवा रस्ता अपघातात जखमी झालेल्या गायी भगवान कोकरे सांभाळतात. गोधनामुळे तो श्रीमंत झाला खरा, पण या तीनशे गाईंना रोज काय खायला घालायचं, त्यांचं पालनपोषण कसं करायचं, या विचारानं तो तितकाच अस्वस्थही आहे.चिपळूणच्या लोटे गावच्या माळरानावर भगवान कोकरे आपल्या गोधानसह वावरतो. त्याच्या आजूबाजूला वावरणारं गोधन पाहिलं की मन प्रसन्न होतं, एक-दोन नाही, तर तब्बल तीनशेहून जास्त गायी भगवान लोकरे जवळ आहेत. पण या गायी त्याने विकत घेतलेल्या नाहीत.ज्यांना इतरांनी किंबहुना त्यांच्याच मालकांनी नाकारलं आहे, त्या गायी भगवान लोकरे जवळ आल्या आहेत. दहा वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर कत्तलखान्यात जाणारा ट्रक लोकांनी पकडला. पण तांत्रिक अडचणीमुळे या गायी पुन्हा कत्तलखान्याकडेच जाणार, हे जेव्हा स्पष्ट झालं, तेव्हा मागचा-पुढचा विचार न करता कोकरेने त्याची जबाबदारी उचलली आणि इथूनच सुरु झाला हा गोसंचय.रस्त्यात अपघातात जखमी झालेल्या मरणासन्न अवस्थेत गेलेल्या गायी कोणीच पाहत नाही, म्हणून कोकरेच्या आवारात येऊ लागल्या. यातूनच मग स्थानिक पातळीवर कुठेही जनावर जखमी झालं, की त्याचं पालकत्व स्वीकारणारा माणूस म्हणून त्याची ओळखच बनली. कोकरे जनावरांना जीवापाड जपतो अशी ओळख निर्माण झाल्याने कोकणात गावातील अनेक शेतकरी आर्थिक स्थितीने गायी-गुरं सांभाळणं झेपत नसल्याने कोकरेकडे आणून देऊ लागली.एक-एक करत गायींची संख्या तीनशेच्या पार गेली आहे. चिपळुणात स्वतःचं एक दुकान आणि प्रवचनाची आवड असलेला कोकरे दुकान आणि प्रवचनातून होणाऱ्या अर्थार्जनातूनच हा सारा व्याप सांभाळतो. कोकरेच्या या कामात त्याला मदत करण्यासाठी आता या परिसरातील अनेक सुशिक्षित तरुण मंडळी पुढे येत आहेत. आता ही गोशाळा पहायला येणारी मंडळी मदत करतात पण ती अगदीच तुटपुंजी असते. गायींचा चारा-औषध उपचार यासाठी या मंडळींना दारोदार भटकावंच लागतं. सरकारने गोवंश हत्येबाबत कायदा केलापण भाकड झालेल्या- लोकांनी नाकारलेल्या या गायींचं काय..? त्यांचं संगोपन कोणी आणि कसं करायचं? याबाबत सरकार पातळीवर पूर्ण उदासीनता आहे. कोकरेंच्या आवारात असलेल्या सर्वाधिक गायी या शेतकऱ्यांनी आता गुरं सांभाळणं परवडत नसल्याने त्यांच्याकडे आणून सोडली आहेत. कोणाला तरी विकली तर कत्तल खान्यात जातील त्यापेक्षा कोकरेंकडे जिवंत राहतील म्हणून आणून सोडली जात आहेत केवळ कामाचं कौतुक करुन कोरड्या शुभेच्छांनी आपली जनावर सोडून जात आहेत. राजकीय पक्ष, नेते कोरडी सहानुभूती दाखवतात, पण प्रत्यक्ष मदत होतच नाही, हा कोकरे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या मंडळींचा आजवरचा अनुभव आहे.इथे आलेली बहुतांश जनावरे जखमी असतात. कोकरेंच्या आवारात अनेक आंधळी जनावरे आहेत, तर काही पायाने पूर्णतः अधू… काहींना त्वचा रोग झाले आहेत. त्या सगळ्यांवर इथे उपचार होत आहेत. 300 हून अधिक गायी सांभाळण्याचं शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करणाऱ्या भगवान कोकरे यांच्याकडे स्वतःची जमीन नाही.लोटे औद्योगिक वसाहतीच्या ग्रीन झोन मध्ये ते हे सारं गोधन सांभाळतात. यामुळे इथे विद्युत पुरवठा नाही. त्यामुळे शेण-गोमूत्र यावर प्रक्रिया करुन त्यातूनही अर्थार्जन करता येत नाही. पावसाळ्यात कोकणातल्या हिरव्या चाऱ्यावर दिवस जातात पण उन्हाळ्यात समस्यांचा डोंगर उभा राहतो. जमा झालेल्या प्रचंड गोधनाची ही श्रीमंती आहे, पण त्यांना जगवायचं कसं, ही भ्रांत त्याला सतत सतावत आहे.

* भगवान कोकरेला मदत करण्यासाठी संपर्क :

भगवान कोकरे , मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग लगत,एम आय डी सी लोटे,तालुका खेड जिल्हा रत्नागिरी

संपर्क - 9921487148 /  7276270910

No comments:

Post a Comment