तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना पहिला वर्धापन दिन व दिपावलीच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 5 August 2017

सुभाष देसाईंनी 400 एकर जमीन बिल्डरच्या खिशात घातली : धनंजय मुंडे.

_________________________

एकीकडे खासगी बिल्डरला फायदा पोहोचवल्याच्या प्रकरणात प्रकाश मेहतांची गच्छंती होण्याची स्थिती असताना दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई देखील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी 600 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र शिवसेनेच्या जवळच्या बिल्डरला फायदा मिळावा यासाठी यातली 400 एकर जमीन देसाईंनी आरक्षित भूखंडातून वगळल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला आहे. प्रकाश मेहतां सोबतच मुख्यमंत्र्यांनी सुभाष देसाईंवरही कारवाई करावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे.

No comments:

Post a Comment