तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 August 2017

उत्तर प्रदेशात पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे 6 डबे घसरले, 30 हून अधिक प्रवासी जखमी.


_________________________

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जवळील खतौली स्टेशन येथे पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे जवळपास 6 डबे रुळावरुन घसरले आहेत. ही एक्स्प्रेस हरिद्वारच्या दिशेनं जात होती. शनिवारी संध्याकाळी 5 वाजून 46 मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे. हरिद्वारहून पुरीकडे जाणारी कलिंग उत्कल एक्स्प्रेसचा भीषण असा अपघात झाला आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 30 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. काही जण मृत पावल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान स्थानिक रहिवासी दुर्घटनाग्रस्त प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुर्घटनेची छायाचित्रं पाहून हा अपघात खूपच भीषण असल्याचे दिसत आहे. अपघाता दरम्यान एक्स्प्रेसचे डबे एकमेकांवर चढले आहेत. तर रुळालगत असलेल्या एका घरातही एक्स्प्रेसचा डबा घुसल्याची माहिती समोर आली आहे. मुजफ्फरनगर आणि मिरतहून मदत आणि बचाव पथक घटना स्थळाकडे रवाना करण्यात आले आहे. ही ट्रेन शनिवारी रात्री 9 वाजे दरम्यान हरिद्वार येथे दाखल होणार होती.

No comments:

Post a Comment