तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 2 August 2017

सोन्सुरे येथे सद्गुरु बालदत्तनाथ महाराज यांचा 86 वा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला..

तसेच या कार्यक्रमात इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व इयत्ता चौथी, सातवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा व पत्रकारांचा सत्कार तसेच रुग्णालयाला साहित्य वाटप करण्यात आले..

यावेळी "दैनिक रत्नागिरी टाईम्सचे पत्रकार व "कोकणचा तडाखा" या साप्ताहिकाचे संपादक तसेच "कोकणचा तडाखा" या सोशल मिडिया ग्रुपचे एडीटर आबा खवणेकर, दाजी नाईक, संजय मालवणकर व अनिल निखार्गे या सर्व पत्रकारांचा यावेळी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला..

वेंगुर्ले (प्रतिनिधी) :- अनादि सनातन संस्थेमार्फत सद्गुरु बालदत्तनाथ महाराज यांचा 86 वा जन्मोत्सव सोन्सुरे येथिल मठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा झाला. यावेळी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव, पत्रकारांचा सन्मान आणि रुग्णालयाला साहित्य वाटप करुन सामाजिक उपक्रमही राबविण्यात आला..

अनादी मानवता सत्यधर्म जनजागृती विश्वबंधुत्व शांतीकेंद्र संस्था आरवली-सोनसुरे येथील सद्गुरू  बालदत्तनाथ महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त पहाटे दुग्धाभिषेक, पुजा, शिवयाग, सकाळी अखंड नामस्मरण आदि धार्मिक कार्यक्रम साजरे झाले.

तसेच सकाळी शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात संस्थेतर्फे फॅन व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच दुपारी महानैव्येद्य झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व इयत्ता चौथी, सातवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच यावेळी तसेच यावेळी रत्नागिरी टाईम्सचे वेंगुर्ले तालुका प्रतिनिधी व कोकणचा तडाखा या साप्ताहिकाचे संपादक आबा खवणेकर, पत्रकार दाजी नाईक, संजय मालवणकर, अनिल निखार्गे या पत्रकारांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला क्षेत्राधिकारी आजोबा, शिरोड्याचे माजी सरपंच गुंडु गावडे, मुंबईचे उद्योजक राजाराम ओंबळे, शंकर परब, संतोष वाघे, यदुनाथ चिपकर, संस्थेचे अध्यक्ष अनंत मगर, थिविम प्रभुगांवकर आदि मान्यवर उपस्थित होते..या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक गावडे यांनी तर आभार अनंत मगर यांनी मानले. दरम्यान रात्री पाद्यपुजा, पालखी मिरवणूक आदि कार्यक्रमांनी हा जन्मोत्सव कार्यक्रम संपन्न झाला...

1 comment:

 1. BALDATTANATH is tenth Avtar,ie KALKI AVATAR,
  In his lifetime he Created KSHETRA,
  Which is meant for self realization,

  Every Year, on His Jayanti, and, Punyatithi ( DATTAJAYANTI )

  THE Authorities and Bhaviks undertake various social welfare programs.

  A kind request,
  Please visit this KSHETRA

  GOD BLESS ALL.

  ReplyDelete