तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 1 August 2017

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी


सोनपेठ ता.१(बातमीदार) सोनपेठ शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
साहित्य रत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त शहरातील आण्णाभाऊ साठे चौकात त्यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजभुषण महादेव मोटे प्रमुख पाहुणे बळीराम काटे, सुधीर बिंदु ,जावेद कुरेशी हे होते तर जयंती महोत्सवाचे अध्यक्ष नारायण साळवे यांच्या सह  दिपक कांबळे, वामन चव्हाण, दत्ता भिसे,संतोष साळवे, निहाल चव्हाण, करण गवारे,शंकर देडे,केरबा साळवे, ज्ञानेश्वर मिसाळ,मारोती चव्हाण, आकाश चव्हाण, गोविंद चव्हाण आशोक गालफाडे बालाजी चव्हाण शांताराम मिसाळ आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .शहरात ता.२० आँगस्ट रोजी जयंतीनिमित्त एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या वर्षी डिजे मिरवणुक टाळुन समिती समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष नारायण साळवे यांनी यावेळी सांगितले.
फोटो :- आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतांना मान्यवर

No comments:

Post a Comment