Breaking News
Loading...

Tuesday, 1 August 2017

गळा चिरुन विवाहितेस जीवे मारण्याचा प्रयत्न


सोनपेठ ता.१(बातमीदार) डिघोळ येथील विवाहितेस पैशासाठी गळा चिरुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या बद्दल पाच जणा विरुद्ध सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
डिघोळ येथील अश्विनी नवनाथ लुगडे वय २३ या विवाहितेस ता २८ रोजी नवरा नवनाथ याने घराच्या छतावर नेऊन तुझ्या बापाकडुन दोन लाख रुपये का आणत नाहीस म्हणुन चाकुने गळा कापला व चाकुने तिच्यावर वार केले .या घटनेत विवाहिता गंभीर जखमी झाल्याने तिला अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले .या प्रकरणी सोनपेठ पोलिसांनी नवनाथ तुकाराम लुगडे या तिच्या पती सह निलावंती लुगडे ,तुकाराम लुगडे,अरुण लुगडे सुवर्णा लुगडे यांच्या विरुद्ध अश्विनी लुगडे हिच्या.फिर्यादीवरून भादवि.कलम ३०७,४९८,अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पिएसआय संतोष मुपडे हे करत आहेत .

No comments:

Post a Comment