Breaking News
Loading...

Thursday, 3 August 2017

चौधरी गल्लीतील रेशन दुकानाचा परवाना रद्द करा

कार्तिक पाटील

★तीन महिण्या पासून करत नाही स्वस्त धान्य आणि रॉकेलचा पुरवठा

★नगरसेवकां सह नागरीकांची तहसीलदारां कडे मागणी

पाथरी/प्रतिनिधी:-चौधरी गल्ली येथे गेल्या तीन महिन्यापासून केरोसीन व रेशन चा पुरवठा  होत नसल्या बद्द्ल , रेशन दुकानदार रफिक फारोकि पिता शफिक फारोकि दुकान नं. ९ या दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात यावा.
या  समंधिचे निवेदन  नायब तहसीलदार कोकाटे  यांना  देण्यात आले
यात म्हटले आहे की संबंधीत दुकानदार गेले तीन महिण्या पासून लाभधारकांना स्वस्त धान्य आणि रॉकेल देत नाही त्या मुळे या रास्तभाव दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा या निवेदनावर नगरसेवक अलोक चौधरी ,नगरसेवक  सतीश वाकडे ,नगरसेवक साजिद बेलदार ,उत्त्तम झिंझुर्डे, शेख अनवर,चंद्रकांत गवारे ,संतोष हिवाळे. श्रीपाद ब्रम्हपूरकर, ,लक्ष्मीकांत दडके आदी मोठ्या संखेने लाभधारकांच्या स्वाक्ष-या आहेत.

No comments:

Post a Comment