तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 5 August 2017

अ भा ग्रा पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपण


----------------------------------------
मोताळा :- आज येथील बोराखेडी पोलिस स्टेशन येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या  वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
    आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपूर्ण राज्यात वृक्षारोपण करण्याचे आवाहन केंद्रीय व राज्य समिती यांच्या वतीने करण्यात आले होते त्या अनुषंगाने आज मोताळा तालुका यांच्या वतीने बोराखेडी पोलिस स्टेशन येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच वृक्ष जगण्याची हमी पोलीस विभागाने घेतली .
   यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकारसंघाचे जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील, तालुका अध्यक्ष जावेद खान, शहर अध्यक्ष अनिल कलाल,तसेच शहरातील पत्रकार विश्वास पाटील,पप्पु राठी, शाहिद कुरेशी, दिपक शेळके, संतोष भोपळे, शंकर तेलंग, ज्ञानदेव हरमकार, रहिम शाह, रशीद पटेल, संजय गरूडे तसेच बोराखेडी पोलिस स्टेशन चे कर्मचारी सुनील हिवाळे , नरेश रेड्डी, श्याम देवकर, संजय गोरे , तय्यब अली, समाधान तेलंग, शिवाजी चाहकर सह आदी मान्यवर उपस्थित होते

No comments:

Post a Comment