तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 1 August 2017

साळींबा जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांचा जिव धोक्यात .

शिक्षण विभाग झोपेत

वडवणी प्रतिनिधी ;- तालुक्यातील साळींबा येथे जि.प. चि 1 ते 8 वी पर्यंतची शाळा असून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .तरी चार वर्ग खोल्या या गेल्या 30 ते 40 वर्षापासूनच्या असून या वर्ग खोल्या मोडकळीस आलेल्या असून भिंतीला चोहो बाजुने तडे गेलेले असून या वर्ग खोल्या धोकादायक बनल्या आहेत .तरी यामध्येच विद्यार्थी बसुन शिक्षण घेतात तरी त्यामुळे विद्यार्थी ,शिक्षक यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे .तरी वर्ग खोल्या दुरुस्ती व बांधकामासाठी जि.प.ने निधी द्यावा यासाठी गेल्या चार वर्षापासून साळींबा ग्रामस्थ झगडत आहेत .तरी याकडे शासनाने पाहाणी करून अहवाल देण्यापलिकडे काहिहि केलेले नाही .तरी जि.प.ने तात्काळ निधी न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शा.व्य.स.अध्यक्ष सौ.सुषमा विनायक जाधव यांनी दिला आहे .
वडवणी तालुक्यातील साळींबा येथील जि.प.शाळेच्या जुन्या चार वर्ग खोल्या या गेल्या 30 ते 40 वर्षापूर्वी बांधलेल्या असून या वर्ग खोल्या विट व पञ्याच्या असून चोहोबाजुने तडे गेलेले आहेत .गेल्या दोन वर्षापूर्वी उन्हाळ्यात   दोन वर्ग खोल्या पडल्या होत्या यामध्ये शाळेला सुट्या असल्यामुळे कसलीही दुर्घटना घडली नव्हती .तरी सध्या पावसाळा सुरू असून या जिर्ण झालेल्या वर्ग खोल्यातच चिमुकले विद्यार्थी बसुन शिक्षण घेतात तरी या वर्ग खोल्या धोकादायक बनल्या असून त्या केव्हाही पडु शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे .तरी या मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्या दुरुस्ती व बांधकामासाठी जि.प.ने निधी द्यावा यासाठी शा.व्य.समिती व ग्रामस्थ यांनी लेखी निवेदनाव्दारे जि.प.मुख्याधिकारी,शिक्षण अधिकारी ,गटशिक्षण अधिकारी यांच्या कडे केलेली आहे .परंतु भेट देऊन अहवाल देण्यापलिकडे काहीही तरतुद करण्यात आलेली आहे .तरी साळींबा जि.प.च्या मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्यासाठी जि.प.ने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा नसता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शालेय व्यवास्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.सुषमा विनायक जाधव व साळींबा ग्रामस्थांनी दिला आहे .

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'राहुल गायसमुद्रे' वडवणी , बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 7066878277  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment