तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 1 August 2017

शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा ईशारा


सोनपेठ  शेतकरी संघटनेच्या वतीने  शेतकऱ्यांच्या संपुर्ण कर्जमुक्तीसाठी सरकारला प्रस्ताव देण्यात आला व तीव्र आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.
राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारला शेतकऱ्यांच्या संपुर्ण कर्ज मुक्ती साठी एक प्रस्ताव तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आला आहे.या प्रस्तावात शेतीमालाचा भाव,शेती संबधी कायदे रद्द करणे ,शेती तंत्रज्ञान ,मुलभुत संरचना,कृषी निविष्ठा व संपुर्ण विज बिल व कर्ज मुक्ती साठी शरद जोशी यांना अभिप्रेत भारत उत्थान कार्यक्रम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.या प्रस्तावावर सरकारने गांभीर्याने विचार करुन शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमुक्ती द्यावी असे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात तीन सप्टेंबर रोजी राज्यभर एक दिवसाचे उपोषण करण्याचा तसेच सत्ताधारी पुढाऱ्यांच्या सभा उधळण्याचा व पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.यावेळी सुधीर  बिंदु माधव जाधव सोमनाथ नागुरे धुराजी जाधव  विकास जाधव अमृत कदम गणेश कदम अरुण कदम सुर्यकांत कदम विनायक कदम गणेश हेंडगे अनंता जोगदंड  गणेश पाटील माणिकराव काळे कांबळे गुरुजी पंडीतअण्णा भोसले भागवत बचाटे माऊली जोगदंड आण्णा जोगदंड देविदास भुजबळ धुराजी जाधव सुर्यकांत कदम भगवान चांदवडे दिगांबर होसनाळे दत्ता भोसले विश्वभंर गोरवे भगवान जोगदंड रमेश मोकाशे दत्ता पवार बबन मोहिते विद्याधर धानोरकर यांच्या सह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते .

फोटो :- शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारला संपुर्ण कर्जमुक्तीसाठी प्रस्ताव देण्यात आला या प्रसंगी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी

No comments:

Post a Comment