तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 4 August 2017

बार्टीच्या वतीने साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे समता सप्ताह

सोनपेठ : तालुक्यातील लालबहादूर शास्त्री विद्यालय लासिना येथे नवीन पिढीला अण्णाभाऊच्या  साहित्यातील  विचाराची गरज आहे. त्यामुळे अन्नाच्या भुकेपेक्षा ज्ञानाच्या भुकेला अधिक महत्व आहे असे प्रतिपादन जिल्हा प्रकल्प अधिकारी दि. फ. लोंढे यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक अंकुश परांडे होते.
सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था बार्टी पुणे. यांच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या समता सप्ताहा निमित्त तालुक्यातील लासीना येथील लाल बहाद्दुर शास्त्री विद्यालयात बोलतांना व्यक्त केले. आण्णाभाऊ साठे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्यिक व थोर समाज सुधारक अशी त्यांची ओळख शाळा व महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने समता सप्ताह राबविण्यात येत आहे.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अंकुश परांडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा प्रकल्प अधिकारी दि. फ. लोंढे सर होते. तसेच तालुका समता दुत अंकुश रसाळ,पत्रकार सुग्रीव दाढेल यांचीही उपस्थिती  होती. पुढे बोलतांना लोंढे म्हणाले कि,  अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य अतिशय दर्जेदार व अंतरराष्ट्रीय भाषेत लिहीलेले आहे. त्यांच्या  साहित्याची तरुण पिढीला प्रेरणा दिली आहे. अणाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या कथा पोवाडे यासह अन्य साहित्य अंतरराष्ट्रीय भाषेत लिहीली गेली आहेत. त्यामुळे नविन पिढीच्या डोक्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार पेरणे गरजेचे आहे. आपले भविष्य हे आपल्या हातात आहे. त्यामुळे भविष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षण हे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षणाला अधिक महत्व देऊन तरुण पिढीने अण्णाभाऊ साठे यांचे विचार आचरणात आणावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्ता परतवाड यांनी तर आभार प्रमोद मोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पिंटु निरस, बळीराम कदम यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment