तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 August 2017

सेनगांव येथील श्री.१००८ महाविर दिगंबर जैन मंदिरातर्फे सात दिवसीय उपचार शिबिराचे आयाेजन

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- येथील श्री.१००८ महाविर दिगंबर जैन मंदिरातर्फे दि.२० ऑगस्ट रविवार ते २६ ऑगस्ट शनिवार या सात दिवशीय भव्य उपचार शिबिराचे आयाेजन केले असुन उदघाटक म्हणुन सेनगांव तहसिलच्या तहसिलदार वैशाली पाटील राहणार आहेत.
एक्युप्रेशर नैसर्गीक चिकीत्सा पध्दत आहे आपल्या हातात आणि पायात एक्युप्रेशर पाँईंट असतात ज्यांना दाबल्यास शरीरातील राेग,आजार हळुहळु नैसर्गीक पध्दतीने विना औषध बरे हाेऊ लागतात त्याने रक्ताभिसारण आणि राेगप्रतिकारक शक्ती वाढते या शिबिरामध्ये भारतीय एक्युप्रेशर अँन्ड हेल्थ केअर संस्था हनुमानगढ (राज्यस्थान) येथील सुप्रसिध्द डाँ.सुरेंद्रसिंह यांच्याकडुन ईलाज व याेग्य मार्गदर्शन दिले जाणार आहे. शिबिराचे वैशिष्ट्ये ब्लड प्रेशर, कंबर दुखणे,थायराईड,साईरिका,हाडाचा त्रास,लकवा,पाेटातील विकार,शुगर,मानेचे विकार,झाेप न येणे,गँस,काेनताही जुना आजारावर या सात दिवसीय शिबिरात उपचार केले जातील. हे शिबिर भारत मेडीकल यांच्या नविन जागेत असेल व सकाळी ०८-३० ते १२-३० व दुपारी ०४ ते ०७-३० पर्यंत असेल. तरी या शिबिरात बहुसंख्येने उपस्थित राहुण गरजु रुग्णांनी उपचाराचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.१००८ महाविर दिगंबर जैन मंदिर सेनगांव च्या विश्वस्ताकडुन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment