Breaking News
Loading...

Saturday, 5 August 2017

जडी बुटी दिन साजरा

गंगाखेड(प्रतिनिधी)तालुक्यातील  खंडाळी येथे दिनांक 4 ऑगस्ट रोजी पतंजली योगपीठ हरिद्वार चे आयुर्वेद आचार्य बाल कृष्ण महाराज यांचा जन्म दिवस जडी बुटी दिन म्हणून साजरा करण्यात आला .या प्रसंगी जिल्हा योग प्रचारीका लक्ष्मी खरात,योग् शिक्षक शिवाजी खरात, प्रकाश डिकळे,भागवत बर्वे,गोपाळ मंत्री ,महिला पतंजली योग समिती परभणी च्या महिला महामंत्री अभिलाषा मंत्री,मंडळ प्रभारी निखिल वंजारें यांनी उपस्थित योग साधकांना विविध औषधी  वनस्पती चे विविध रोगा वरील सोपे घरगुती  उपाय सांगितले.तसेच तुळस,आवळा, अमृता,पानफुटी, नागदोन,गूळ वेल, कोरफड,गुंजा, उंबर आदी औषध वनस्पतीचे वाटप करण्यात आले.तसेच गावात ग्राम स्वछता अभियान राबविण्यात आले.या प्रसंगी गावातील किशोर शिंदे ,विष्णुदास भोसले,विठ्ठलराव कोल्ह ,ज्ञानोबा खटिंग , पुष्पा कोल्हे सागरबाई कोल्हे, सारिका बारगिरे ,गोविंद शिंदे, राजाराम भोसले, शंकर दशरथ कोल्हे,  माळवे, सरपंच सदाशिव भोसले ,भगवान भोसले,  चरणदास भोसले आशाताई भोसले ,यमुना खटिग, सुरेखा माळवे,महानंदा माळवे, उपस्थित होते. तसेच शहरातील गोकुळ चिंतामणी बालक मंदिर येथे पण जडी बुटी दिन  कार्यक्रम पार पडला.या ठिकाणी उपस्थित योग् साधक देवानंद जोशी ,लक्ष्मण जब्दे , राम कुलकर्णी अंकुश मदनवाड, रूपाली जोशी ,शकुंतला कुलकर्णी, सुनीता कुलकर्णी, विद्या कुलकर्णी ,सविता नाव्हेकर, मंगल पाठक, पुष्पा शेटे ,माणिकराव महाराज नाव्हेकर ,कल्याणी जोशी समृद्धी जोशी ,वैशाली पोतदार, कमलाबाई शेटे, नंदा जोशी, मंगल चौलवार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment