तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 4 August 2017

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी खोडवेकरांच्या निवासस्थान व केबिन उधळपट्टी प्रकरणी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांचे दिले चौकशी चे आदेश

परभणी ( प्रतिनिधी) जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी खोडवेकर यांनी वित्तीय मर्यादा डावलीत स्वतः च्या निवासस्थान व दालनाच्या किरकोळ दुरुस्तीवर सुमारे 31 लाखाहूनही अधिकच खर्च केल्याने त्यांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश ग्रामविकास मंत्री ना पंकजाताई  मुंडे यांनी विधानपरिषदेतील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिले आहेत, आ बाबाजानी दुरानी यांनी ह्या गैरप्रकाराच्या विरोधात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता,                              निवासस्थान व केबिन सुस्थितीत असतांना केवळ स्वतः च्या चैनी खातर खोडवेकर यांनी वित्तीय मर्यादा डावलीत किरकोळ दुरुस्ती वर लाखो रुपयांची उधळपट्टी केल्या बाबतची आ बाबाजानी दुरानी यांची तक्रार मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांच्या कडे  प्राप्त झाली आहे , त्यावरून मुख्यमंत्री कार्यालयने दिलेल्या आदेशानुसार ग्रामविकास विभागाने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त यांच्या मार्फत गैरप्रकारांची चौकशी करण्यात येत आहे, त्यांनी दोन सदस्यांची चौकशी समिती नेमून प्रक्रिया सुरू केली आहे, 21 जुलै रोजी चौकशी अधीकारी यांच्या कडून कार्यवाही सुद्धा सुरू करण्यात आली आहे, त्यांचा अहवाल प्राप्त होतात दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती न मुंडे यांनी दिली                                       जी प ceo खोडवेकर यांच्यासह जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यावरही कारवाई चे गंडांतर येण्याची शक्यता  विश्वास निय सूत्रांनी व्यक्त केली आहे , स्वच्छ भारत अभियान व निवासस्थान / केबिन उधळपट्टी असे  दोन्ही प्रकरने राज्य शासनाने अत्यंत गंभीर घेतलेले आहेत,स्वच्छ भारत अभियान प्रकरणी अनेक गटविकास अधिकारी ही अडचणीत आले आहेत,    येत्या आठवड्यात लक्षवेधी चर्चेला येणार असून त्यावेळी अनेक निलंबनाची शक्यता आ दुरानी यांनी व्यक्त केली आहे

No comments:

Post a Comment