तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 1 August 2017

गेवराई तालुक्यातील मालेगाव शाळेत जयंती व पुण्यतिथी साजरी

सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. 1 __ तालुक्यातील मालेगाव येथिल भिमसिंह पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
     या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन आशोकराव जाधव व प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सरपंच खंडु मामा पांजरकर, अदिनाथ खंडागळे, सोमनाथ औटे यांची उपस्थिती लाभली. शाळेच्या वतीने अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. महापुरुषांच्या विचाराची समाजाला गरज आहे व त्याचे आचरण करणे प्रत्येक तरुणाचे कर्तव्य आहे असे विचार प्रमुख अतिथी यांनी मांडले. त्यानंतर सहशिक्षक निकाळजे सर, खराद सर, अदिनाथ
खंडागळे, बाबासाहेब खराद यांनी आपले विचार स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक निकाळजे सर यांनी तर सुत्रसंचलन व आभार खराद सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक बने सर, गोरे मॅडम, खराद मॅडम, सेवक शेख यांनी परीश्रम घेतले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment