तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 5 August 2017

सकल मराठा समाजाच्या वतीने परतूरला उद्या भव्य मोटरसायकल रॅली


आशिष धुमाळ
परतूर

क्रांती दिनी 9 आॅगस्ट 2017 रोजी मुंबई येथे होणार्‍या मराठा क्रांती मुक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोर्चाची जनजागृती करण्यासाठी परतूर शहरामधुन उद्या दिनांक 06 आॅगस्ट 2017  रविवार रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता परतुर शहरामध्ये मोटरसायकल रॅली व आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.आष्टी गेट वरून सकाळी 10:00 वाजता या वाहन रॅलीला सुरवात होणार आहे.आष्टी,कोकाटे हादगांव, श्रीष्टी सर्कलची वाहने आष्टी रेल्वे गेट येथे जमा होतील. सातोना,वाटुर सर्कलची वाहने साईबाबा मंदीर टी पाँईटवर जमा होतील.व नंतर ठिक 10:00 वाजता दोन्ही पॉइंट वरुन समोर प्रचार रथ येतील व आष्टी गेट येथे भेटतील येथून पुढे समोर प्रचार रथ राहतील व पाठीमागे दोन लाईन मध्ये मोटरसाकली
असतील ,महादेव मंदिर
शिवाजी नगर,तहसील कार्यालय चौक, पुलिस स्टेशन,मलंग शाह चौक,नारायण दादा चौक,पुलिस स्टेशन तहसील,कॉलेज रोड कॉलेज ग्राउंड वर आढावा बैठक होईल .दिनांक 9 आॅगस्ट 2017 च्या मुंबई येथील महामोर्चा बाबत माहिती दिली जाईल.सदरील रॅलीमध्ये कुणीही सेल्फी काढू नयेत
रॅली मध्ये शिस्त व आचार सहिंतेचे काटेकोरपणे पालन करावे सध्या परतुर शहरात ड्रेनेज लाइनचे काम सुरु असल्या कारणाने रॅलीच्यामार्गा मध्ये आईनवेळेस बदल होऊ शकतो. या वाहन रॅलीत सामाज बांधवांनी आपोआपली वाहने घेऊन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.

No comments:

Post a Comment