Breaking News
Loading...

Saturday, 5 August 2017

मुंबईत दादर चौपाटीवर तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू.


_________________________

मुंबईच्या दादर चौपाटीवर 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. बुडालेली तीनही मुलं महापालिकेच्या शाळेत शिकणारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. दादर चौपाटीवर आज दुपारी फिरायला गेलेली तीन शाळकरी मुलं बुडाली. माहिम पश्चिमेला राहणारी तीनही मुलं महापालिकेच्या शाळेत शिकत होती. अनुपकुमार यादव(16), भरत हनुमंता (13) आणि रोहित कुमार यादव(15) अशी बुडालेल्या मुलांची नावं आहेत. बुडालेल्या तीनही मुलांना बाहेर काढण्यात आलं आहे. यात भाभा रुग्णालयात तिघांचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

No comments:

Post a Comment