तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 5 August 2017

अलाहाबाद बँकेच्या एटी टी एम मशीनवर अंकच नाहीत पिन कोड व रक्कम टाकताना ग्रहांकाचा गोंधळ व्यवस्थापकाचे अक्षम्य दुर्लक्ष

रिसोड:- महेन्द्र महाजन जैन

रिसोड शहरातील बँकेशी संबंधित समस्या दिवसेंदिवस वाढतच असून सामान्य ग्राहकाला त्रागा केल्याशिवाय पर्याय नाही नोट बदल व नोट बंदीच्या काळापासून शहरातील बँकेचे कर्मचारी अधिकारी व ग्राहक यामधील सुसंवाद संपत चालला आहे. बँकेचे अधिकारि व कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे वागल्याच्या अनेक तक्रारी वाढत आहेत. बँक जणू अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक मालकीची असल्याचा अविर्भाव अधिकाऱ्यांकडून पाहायला मिळत आहे.अलाहाबाद बँकेचे व्यवस्थापक तर प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा आपल्या बुद्धीमत्तेचे रिकामे प्रदर्शन करून फक्त कामचलाऊ धोरण अवलंबित ग्राहकांची  केवळ दिशाभूल करीत असतात हीच परिस्थिती जवळपास सर्वच बँकांची आहे. अलाहाबाद बँकेचे एकमेव एटीम शहरात उपलब्ध आहे त्याची काळजी घेण्याची साधी गरज सुद्धा बँकेला वाटली नाही.एटीम च्या वापरामुळे की-बोर्ड सर्वच अंक पुसल्या गेले आहेत त्यामुळे मशीन वरील अतिशय महत्वाच्या की-बोर्ड वरील अंकच अदृश्य झाले आहेत.ग्राहक केवळ कौशल्य वापरून अंदाजे बटणं दाबून आपला पिन कोड व काढावयाची रक्कम टाकतात ही अतिशय गंभीर बाब असून संबंधित प्रशासनाने याची दखल घेत सुविधा देण्याकरिता कटिबद्ध असावं अन्यथा शाखा बंद करावी अशी टोकाची भूमिका  सामान्य ग्राहक व्यक्त करीत आहे.

महेन्द्र महाजन जैन रिसोड
9960292121

No comments:

Post a Comment