तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 2 August 2017

सोनपेठ परिसरातील कालव्यांना पाणी सोडण्यासाठी मागणी - भाई गणेश हेंडगे


-----------------------
25 दिवसांपासून पाऊस नसल्याने पेरणी वाया जाण्याची चिंता
माजलगाव धरणातून पाणी सोडण्याची मागणी.
तेजन्युज सोनपेठ / प्रा. डॉ. संतोष रणखांब
सोनपेठ -  तालुक्‍यातील पावसाअभावी खरीप पिके अक्षरशः करपून चाललीआहेत. जूनच्या सुरुवातीस या भागात पावसाने चांगली हजेरी लावली होती. या पावसाच्या भरवशावर बाजरी, सोयाबीन, मूग, कापूस, मका या पिकांची तयारी अनेक शेतकऱ्यांनी केली होती. ही पिके ओलाव्यामुळे उगवून आली. परंतु, जवळपास 25 दिवसांपासून परिसरात पावसाची अल्पशी सरही कोसळली नाही.
ढगाळ वातावरण आणि अधूनमधून ऊन पडत असल्याने पिकांची पाने पिवळी पडत आहेत.
पावसाने ताण दिल्याने पिके कोमेजून जात आहेत. संपूर्ण पीक हातचे जाते की काय? अशी चिंता शेतकरी व्यक्‍त करत आहेत. माजलगाव धरणातून पाणी तरी मिळावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी करणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे तालुका सरचिटणीस भाई गणेश हेंडगे यांनी तेजन्युज प्रतिनिधीला दुरध्वनीवरून कळवले आहे.
      कालव्याच्या  पाण्यावर काही काळ तरी पिके तग धरतील, त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी करणार आहोत असे त्यांनी सांगितले. आवर्तनाची मागणी करणारे अर्ज शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे दाखल करावेत.असे अवाहनही त्यांनी केले आहे. असल्याचे बी-बियाणे, खतांवर पैसा खर्च करून शेतकऱ्यांनी पिके घेतली. परंतु, पाऊस नसल्याने हा खर्चही वाया जातो की काय?
  अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने पाणी सोडावे त्यासाठी मागणीचीही वाट पाहू नये अशी अपेक्षा भाई गणेश हेंडगे यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment