तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 2 August 2017

शिक्षकासाठी गटशिक्षणअधिकारी कार्यालयात भरविली शाळा .


वडवणी प्रतिनिधी ;- देवडी येथे १ ली ते ४ थी पर्यंतचि जि.प.प्रा.शाळेत ३५ विद्यार्थी शिक्षण घेतात तरी जुन पासून केवळ एकच शिक्षक असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे .तरी दुसरा शिक्षक तात्काळ द्यावा या मागणी साठी काल बुधवार रोजी ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालयात सर्व विद्यार्थी आणुन शाळा भरविली आहे .
तालुक्यातील देवडी येथेत गावात १ ली ते ४ थी पर्यंतची शाळा असून चार वर्गाला जुन पासून केवळ एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे .तरी शिक्षण विभागाने तात्काळ शिक्षक द्यावा अशी ग्रामस्थांनी सतत मागणी करून हि शिक्षक न दिल्याने काल बुधवार रोजी माजी प.स.सदस्य मच्छिंद्र झाटे यांच्या नेतृत्वाखाली पालकांनी सर्व विद्यार्थी गटशिक्षण अधिकारी कार्यालयात नेऊन शाळा भरविली यावेळी गटशिक्षण अधिकारी कार्यालयात कोणी हि अधिकारी हजर नसल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता .

देवडी येथील विद्यार्थ्यांनी शिक्षकासाठी ग.शि.अधिकारी कार्यालयात शाळा भरविल्याचे समजताच भाजपाचे ता.अ.रामेश्वर सावंत व त्यांच्या कार्यकर्ते हे तेथे गेले व जि.प.शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांना संपर्क साधला आसता दोन दिवसात शिक्षक देण्याचे आश्वासन दिले आहे .

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'राहुल गायसमुद्रे' वडवणी , बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 7066878277  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment