तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 2 August 2017

जप्त वाळुसाठ्याची चोरी,जेसीबी सह दोन डंपरवर गुन्हा दाखल


सोनपेठ / प्रतिनिधी :
तालुक्यातील मौजे शेळगाव शिवारात महसुल विभागाने जप्त केलेला अवैध वाळुसाठा रेतीतस्कराने 1 ऑगस्ट रोजी चोरल्याची घटना घडल्याने यातील जेसीबी सह दोन डंपरवर बुधवार दोन ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शेळगाव शिवारात मार्च महिन्यात महसुल विभागाने गंगाखेड रोड वरील गट क्रमांक 144 मध्ये एकशे पन्नास ब्रासचा अवैद्य रेतीसाठा जप्त केला होता,याच वाळुसाठ्यामधील विस ब्रास रेती एक ऑगस्ट रोजी अफसर कुरेशी यांच्या पोकनेल मशीनने उचलुन ही रेती डंपरच्या साहाय्याने घेऊन जात आसल्याची माहिती येथील पोलिस पाटील यांना मिळाली आसता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन जेसीबी चालक व रेतीवाहुन नेनारे डंपरचालक यांना सदरील रेतीचा लिलाव झालेला नसुन तुम्ही ती उचलु नका आसे सांगितले आसता या प्रकरणातील फिर्यादी सोबोत दमदाटी करून येथील विस ब्रास रेती डंपर क्रमांक एम.एच.20 डी ई 921व एम.एच.22 ए ए 3889 च्या साहाय्याने चोरुन नेली याप्रकरणी सोनपेठ पोलीसात गुन्हा रजिस्टर नंबर 97/2017 कलम 379,34 नुसार दाखल झाला आसुन पुढील तपास पो.हे.कॉ. भागवत सातपुते, पो.हे.कॉ. विलास सातपुते हे करत आहेत.

No comments:

Post a Comment