तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 4 August 2017

मराठा मोर्चाआधी राणेंच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार.

_________________________

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मराठा संघटना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मुंबईत 9 ऑगस्ट रोजी मराठा समाजाचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आमदारांचं एक शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेईल. मराठा संघटना मुख्यमंत्र्यांना मागण्यांचा मसुदा देणार असून त्यावरहे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मराठा आमदार आणि संघटनाची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये बैठक घेण्यात आली. मराठा समाजाच्या 22 मागण्या असल्या तरी मराठा आरक्षणा इतर प्रमुख मागण्यांवर सरकारने निर्णय घ्यावा, अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली. 9 ऑगस्टला क्रांती दिनी मराठा समाजाचा महामोर्चा मुंबईत काढण्यात येणार आहे. हा मोर्चाही मूक आणि शांततेचं दर्शन घडवणारा असेल.

No comments:

Post a Comment