तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 3 August 2017

जम्मूत दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत २ जवान शहीद

जम्मू-कश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात हिंदुस्थानी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दोन जवान शहीद झाले आहेत. हिंदुस्थांनी सैन्याला मध्यरात्री मातृबुग गावात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सैन्यानं परिसराचा सर्च ऑपरेशन सुरू केलं.

सैन्याकडून सर्च ऑपरेशन सुरू होताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरुवातीच्या गोळीबाळात एक मेजर आणि दोन जवानांना गोळ्या लागल्या. या तीनही जवानांना हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं श्रीनगर मिलिट्री बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र तेथे उपचारादरम्यान दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. अजूनही तीन दहशतवादी शोपियानमध्ये लपले असल्याची माहिती आहे..

दुसरीकडे कुलगाम जिल्ह्यात हिंदुस्थानी सैन्यानं दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कुलगाम येथे लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे..

No comments:

Post a Comment