तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 5 August 2017

पांचाळेश्वरात श्रीकृष्ण जन्माष्टमी

सुभाष मुळे..
-----------
गेवराई, दि. ५ __ गेवराई तालुक्यातील तिर्थक्षेञ पांचाळेश्वर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ८ आॅगस्ट रोजी हा जन्माष्टमी सोहळा होत आहे.
       कै. गुरुवर्य आचार्यप्रवर प.पु.प.म.श्री. गुर्जरबाबा यांच्या प्रेरणेने पवते पर्वकाळ व नारळी पोर्णीमा व जन्माष्टी निमीत्त आरती, पंचावतार उपहार महोस्तव या व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीदत्ताञेय प्रभुंचे पांचाळेश्वर तिर्थक्षेञ आत्मतिर्थ नावाने प्रसिद्ध आहे. दत्त प्रभुंचे भोजनस्थान असल्याने या क्षेञाला अधिक महत्व आहे. देशभरातुन भाविक या ठिकाणी येऊन भक्तीमध्ये तल्लीन होतात. ८ आॅगस्ट रोजी जन्माष्टमी सोहळ्याच्या निमीत्ताने कुलवंदनाची पालखी मिरवणुक राञी ७ वाजता होईल. साष्टपिंपळगाव येथील भजनी मंडळाच्या कार्यक्रमानंतर गुरुपुजन होईल.
    श्री गोविंदप्रभु आश्रमाचे मंहत प.पु.प.म.  श्री. विजयराज गुर्जरबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment