तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 1 August 2017

भाजपा महिला मोर्चा प्रदेश समितिवर सौ संघ्याताई प्रफुल राठोड यांची नियुक्ती


जितू चोले
माहूर/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी समितीवर भारतीय जनता पार्टीच्या किनवट-माहूर च्या नेत्या सौ संध्याताई प्रफुल राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
          विष्णूपुरी नांदेड येथील सहयोग सेवाभावी संस्थेच्या परीसरात दोन दिवसीय भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारीणीची बैठक संपन्न झाली यावेळी किनवट-माहूर तालुक्यात भाजपला अधिक सक्षम करण्यासाठी व महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सौ संध्याताई प्रफुल राठोड यांची भाजप महिला मोर्चा प्रदेश समितीवर नियुक्ती केल्याची घोषणा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा ॲड माधवीताई नाईक  यांनी  केली सौ संध्याताई राठोड यांच्या कडे मांडवी येथिल राठोड घराण्याचा सामाजिक वारसा पुढे नेण्याची क्षमता असल्याची भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
                  सौ.संध्याताई राठोड यांच्या नियुक्ती बद्दल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर माजी खा.डी.बी पाटिल,माजी खा.ॲड शिवाजीराव माने,सुधाकरराव भोयर,धरमसिंग राठोड यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

No comments:

Post a Comment