Breaking News
Loading...

Saturday, 5 August 2017

पोलीस व पत्रकारांच्या वतिने शालेय विद्यार्थ्यांना 'सायकल वाटप' उपक्रम


सुभाष मुळे...
------------
गेवराई, दि. 5 __ येथील पोलीस व तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी "सायकल वाटप"  उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, तालुक्यातील नागरिकांनी नादुरुस्त सायकल जमा करून सहकार्य करावे असे आवाहन संयोजन समितीचे वतीने करण्यात आले आहे.
     औरंगाबाद विभागाचे मुख्य परिक्षक आयएसओ प्रा. प्रशांत यांच्या विशेष सहकार्याने गेवराई, तलवडा, चकलांबा पोलीस व गेवराई तालुका पत्रकार संघाच्या विद्यमाने तालुक्यातील गरीब, होतकरू शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकल उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाला  तालुक्यातील जनतेने आपल्याकडे जुनी व नादुरुस्त असलेली सायकल देऊन सहकार्य करायचे आहे. सदरील सायकल उक्त पोलीस ठाण्यात जमा करावी. आवश्यक असेल तर दूरध्वनी ( 9545825555 , 9832372950 ) करून माहिती द्यावी, त्यावर समितीकडून तातडीने संपर्क करण्यात येणार आहे. समितीच्या वतीने व नागरिकांनी केलेल्या सहकार्याने होतकरू विद्यार्थ्यांना दोनशे सायकल वाटप करण्याचा मानस आहे. नादुरुस्त सायकल समितीच्या वतीने दुरूस्त करून, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.
     या चांगल्या उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर , अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,  उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, सचिव सुभाष मुळे, उपाध्यक्ष संतोष भोसले, दिनकर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर, शिवाजी गुर्मे व नियोजन समितीचे प्रा. प्रशांत जोशी यांनी केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment