Breaking News
Loading...

Tuesday, 1 August 2017

मराठा सेवा संघातर्फे पिण्याचे पाणी वाटप

अरुणा शर्मा

पालम :- येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर पहाटे पासून विमा भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. उन्हामध्ये ताटकळत सकाळपासून शेतकरी त्रस्त दिसून येत होते. यासाठी रांगेत उभे राहतारया शेतकरयांना मराठा सेवा संघातर्फे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा संपर्क प्रमुख प्रा. अनंतराव शिंदे यांच्या हस्ते शुध्द पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. शेतकरी ऊन्हातान्हात ताटकळत उभे होते. तर काही शेतकरयांनी शनिवारी रात्री बँटेच्या आवारातच राञ काढली. शेतकरयांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाला खुप त्रास झाला. यासाठी दुपारच्या नंतर राज्य राखीव दलाच्या तुकडीस दिनांक  30 जुलै रोजी पाचारण करण्यात आले होते. यामुळे बाहेरगावाहुन आलेल्या शेतकरयांनी उपासी पोटी राहून पीकविमा भरण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. पाण्याची सुविधा पुरवाण्यासाठी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मोतीराम चवरे, योगेश शिंदे, किरण पवार, पांडुरंग माली पाटील, अनिल शिंदे यांच्यासह मराठा समाज बांधवांनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment