तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 2 August 2017

सेल्फी नव्हे, दारुच्या नशेत तरुणांचा दरीत कोसळून मृत्यू.


_________________________

आंबोलीत दोन पर्यटकांच्या दरीत पडून झालेल्या मृत्यू प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. सेल्फी काढण्याच्या नादात नाही, तर दारुच्या नशेत पाय घसरल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली कावळेसाद मध्ये सोमवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. इम्रान गारदी आणि प्रताप राठोड अशी दरीत कोसळलेल्या दोघांची नावं आहेत. दारु प्यायल्यानंतर दोघं जण डोंगराच्या कड्यावर स्टंटबाजी करत होते. हे नसतं साहस दोघांच्या जीवावर बेतलं.डोंगराच्या कडेला असलेला संरक्षक कठडा ओलांडल्यानंतर व्हिडिओ काढणाऱ्या लोकांनी दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र दारुच्या अंमलाखाली असल्यामुळे दोघांनाही काही समजत नव्हतं. त्याचवेळी एकाचा पाय घसरला आणि त्याच्या सोबतच दुसराही घरंगळत दरीत कोसळला. दरीत दोघांच्या मृतदेहाचा शोध लागलाअसून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गडहिंग्लज मधल्या तरुणांचा एक ग्रुप कावळेसाद पॉईंटवर सहलीसाठी गेला होता. दोघंही जण शेतीची कामं करायची.

No comments:

Post a Comment