तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 5 August 2017

बैठक घेण्यात विलंब प्रकरणी तहसिलदारांची होणार चौकशी


सुभाष मुळे..
-----------
गेवराई, दि. 5 __ गेवराईसह बीड जिल्ह्यात संजय गांधी व श्रावण बाळ सारख्या निराधारांना लाभ देण्यासाठी स्थापन केलेल्या समित्यांच्या बैठका आठ-आठ महिणे होत नसल्यामुळे हजारो अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. निराधारांना चाकरमान्या प्रमाणे महिण्याच्या एक तारखेला अनुदान वितरीत करावे यासह निराधारांच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्‍न दाखल केला होता. प्रश्‍नाच्या उत्तरात शासनाने वस्तुस्थिती मान्य केली असुन समितीची बैठक घेण्यात विलंब केल्या प्रकरणी तहसिलदारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
      गेवराई तहसिल कार्यालयात मोठा सावळा गोंधळ असुन संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक मागील आठ महिण्यात एकदाही न झाल्यामुळे सुमारे सहा हजार निराधारांचे अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित होते. ग्रामीण भागातील निराधार, वयोवृद्ध आणि अपंग लाभार्थी सतत गेवराई तहसिलचे उंबरे झिजवत होते, मात्र सत्ताधार्‍यांनी समितीची पदे घेवुन निराधारांना वार्‍यावर सोडल्यामुळे त्यांचे हाल होत होते. निराधारांच्या प्रश्‍नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. अमरसिंह पंडित सातत्याने संवेदनशिल आहेत. त्यांनी हा विषय तारांकित प्रश्‍नाच्या माध्यमातुन विधान परिषदेत दाखल केला.
  आ. अमरसिंह पंडित यांनी गेवराई तालुक्यात संजय गांधी व श्रावण बाळ सह इतर निराधार योजनेतील लाभार्थ्यांची प्रकरणे मंजुर करण्यासाठी समितीची बैठक घेण्यास आठ-आठ महिणे विलंब झाला असुन त्यामुळे सुमारे सहा हजार अर्ज मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत का ? असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर स्थानिक निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे संजय गांधी निराधार योजना समिती बैठक होवु शकली नाही तरी प्रलंबित लाभार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्या बाबत समितीची बैठक घेण्याची कार्यवाही सुरु आहे असे मोघम उत्तर देण्यात आले. पुढे आ. अमरसिंह पंडित यांनी तालुकास्तरीय बैठक नियमीत व विहीत मुदतीत घेवुन निराधारांचे अनुदान महिण्याच्या एक तारखेला व्हावे आणि बैठक घेण्यास विलंब झाल्या प्रकरणी जबाबदार असणार्‍या विरुद्ध शासन कोणती कारवाई करणार ? असा सवाल केला. त्यावर निवृत्ती वेतनाचे वाटप महिण्याच्या एक तारखेला करणे बाबत शासनाने दि. २७ जुन २०१३ च्या शासन निर्णयानुसार निर्देश दिलेले असुन दि. १०/४/२०१५ रोजीच्या पत्रानुसार जिल्हाधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत तर बैठक घेण्यास आणि लाभार्थ्याची प्रकरणे मंजुर करण्यास झालेल्या विलंबा बाबत तहसिलदार,गेवराई यांची चौकशी करण्यात येवुन कारवाई करण्यात येणार असल्याचे शासनाच्या वतीने या प्रश्‍नाला सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.
       निराधारांच्या या प्रश्‍नामुळे तहसिल प्रशासनात खळबळ उडाली असुन तालुक्यातील निराधारांच्या प्रश्‍नाला आणि मागण्यांना न्याय दिल्याबद्दल आ. अमरसिंह पंडित यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment