तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 2 August 2017

तुमचेही पॅनकार्ड रद्द झालं नाही ना ? चेक करा

नियमानुसार हिंदुस्थानी नागरिक एकच पॅनकार्ड बनवू शकते. मात्र वित्तमंत्र्यांनी संसदेत दिलेल्या उत्तरात सांगितले की हिंदुस्थानात अशा अनेक व्यक्ती आढळल्या आहेत, ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक पॅनकार्ड आहेत. अशा पॅनकार्ड़ची संख्या ११,४४,२११ इतकी असल्याचंही त्यांनी सांगितलं. ही सगळी पॅनकार्ड रद्द करण्यात आली असल्याचं केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. संतोष गंगवार यांनी सांगितलं की तपासणीमध्ये १५६६ बनावट पॅनकार्डदेखील आढळून आली आहे..

अशी तपासा तुमच्या पॅनकार्डची वैधता

ही बातमी वाचल्यानंतर चुकून तुमचंही पॅनकार्ड रद्द झालेलं नाही ना अशी शंका येऊ शकते. तुमचं पॅनकार्ड रद्द झालेलं आहे की नाही हे तपासण्याचा सोपा मार्ग आहे. यासाठी तुम्हाला इंटरनेटचा वापर कसा करावा याचं जुजबी ज्ञान असं आवश्यक आहे. इन्कम टॅक्स वेबसाईटवर क्लिक करा. त्यानंतर KNOW YOUR PAN पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. यामध्ये कोणत्याही प्रकरचं लॉगिन करण्याची गरज नाही..KNOW YOUR PAN वर क्लिक केल्यानंतर तिथे एक फॉर्म मिळेल. त्या फॉर्ममध्ये आपली वैयक्तीक माहिती भरा. मोबाईलनंबर तिथे टाकल्यानंतर मोबाईलवर एक कोड नंबर येईल. तो कोड भरून फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला तुमचं पॅनकार्डची वैधता कळेल..

No comments:

Post a Comment