तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 5 August 2017

मुंबईत मराठा समाजाचा महामोर्चा

सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. 5 __ मराठा समाजाला आरक्षण मिळावे व कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा  करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई येथे मराठा समाजाच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
     या मोर्चाच्या तयारीसाठी गेवराई तालुक्यातील सर्कल निहाय बैठका चालु आहेत. गावागावात होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा संदर्भातील बैठकांना मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कोपर्डी अत्याचार दि. १३ जुलै २०१६ रोजी झालेल्या प्रकरण संदर्भात क्रांतिकारी मुक मोर्चास येत्या ९ ऑगस्ट रोजी १ वर्ष पूर्ण होत आहे. राज्यात लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघुनही सरकारने मात्र समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे येत्या ९ ऑगस्ट रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई येथे मराठा समाजाच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी महाराष्ट्रभर निघालेल्या मोर्चास सरकार गांभीर्याने घेत नसल्याने हा क्रांती महामोर्चा यशस्वी करून समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी समाजाने निर्धार केला असून त्यासाठी गेवराई तालुक्यातील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मोर्चात सहभागी व्हावेत यासाठी गेवराई कृती समिती तालुक्यात सर्कल निहाय बैठका चालु आहेत.

--------------------
गेवराई शहरात रविवारी
जनजागृतीसाठी रॅली
---------------------
शहरातील मराठा समाज बांधवांच्या जनजागृतीसाठी दि. ६ ऑगस्ट रविवार रोजी सकाळी ९ वाजता कन्या शाळेत एकत्रपणे येऊन १० वा गेवराई शहर, सावतानगर, कोल्हेर रोड, बेदरे लाॅन्स, स्टेडियम रोड , एन के प्लाझा, पंचायत समिती मार्गे कन्या शाळा असे भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे, तरी मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment