तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 4 August 2017

 जिल्ह्यातील रेती घाटांना जिल्हाधिकारी यांच्या अचानक भेटी अवैध वाळु साठे आणि वाहने जप्त

 

       परभणी.दि 4- परभणी जिल्हयातील  पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाजार, कानडखेडा तर पालम तालुक्यातील दुटका व गुंज तेथील रेतीघाटांना आज अचानक जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी भेट दिली व अवैध वाळुसाठा व वाहने जप्त करून कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले

पिंपळगाव येथे आज सकाळी 6.00 वाजता जप्त अवैध वाळू साठया जवळ 2 पोकलेन, 1 जीसीबी आणि 1 ट्रक्टर उभे होते. हे जिल्हाधिकारी यांना आढळून आल्याने या वाहन मालकांवर रितसर पंचानामा करुन गुन्हे दाखल करण्याची सूचना पूर्णा तहसिलदार यांना केली.  तसेच कानडखेड येथील जप्त वाळू साठयाला जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली.

पालम तालुक्यातील दुटका येथे मोठया प्रमाणात रेतीसाठा या पाहणीत आढळून आला. हा अनाधिकृत साठा उचलताना पोकलेन तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते परंतु ते यशस्वी होऊ शकले नाही. संबंधित वाहनाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याचा सूचना तहसिलदार यांना देऊन अशा अवैध कामासाठी वापरण्यात येणा-या वाहनावरती सक्त कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिले. तसेच रहाटी शिवारात 6 बोटी आणि 3 पोकलेन पंचनामा करुन जप्त करण्यात यावेत व संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा सूचना पालम तहसिलदार यांना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिल्या.

                                                               

No comments:

Post a Comment