तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 4 August 2017

अजगराने रानटी सशाला गिळले, गावकऱ्यांची उडाली भंबेरी

ठाणे - कल्याण-मलंगगड रस्त्यावरील पालेगावच्या वेशीवर रानटी सशाला गिळताना ७ फुटांच्या अजगराला पाहून गावकऱ्यांची भंबेरी उडाली.

सर्पमित्रांनी पकडलेला अजगर

पालेगावच्या वेशीवर अजगराने रानटी सशाला अजगराने भक्ष्य केल्याचे गावकऱ्यांच्या दुष्टीस पडले. अवघ्या काही मिनिटांत ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. गावकऱ्यांनी त्या अजगराला हुसकावून लावण्यास सुरुवात केली. गदारोळामुळे अजगराने सशाला सोडले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

गावकऱ्यांनी सर्पमित्राला माहिती दिल्यानंतर सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या मिनिटाभरात त्या भल्यामोठ्या अजगराला त्यांनी शिताफीने पकडले. अजगर सुमारे साडेसहा ते सात फुटाचा असून त्याचे अंदाजे वजन ७ किलो आहे. या अजगराला आज सकाळी वन अधिकाऱ्याच्या परवानगीने त्याला जंगलात सोडण्यात आले..

No comments:

Post a Comment